केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आणि भाजप नेते (BJP) रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी अत्यंत महत्त्वाचे विधान केले आहे. ज्यामुळे राज्यातील राजकारण (Maharashtra Politics) तापण्यात आणखीच भर पडली आहे. लोकसभा निवडणुकांसोबतच (Lok Sabha Elections) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकाही (Vidhan Sabha Elections) पार पडतील, असे विधान रावसाहेब दानवे यांनी केले आहे. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाल्या आहेत. महाराष्ट्रात निर्माण झालेला राजकीय पेचाच्या (Maharashtra Political Crisis) पार्श्वभूमीवर रावसाहेब दानवे यांचे विधान अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.
औरंगाबाद (Aurangabad News) येथील फुलंब्री (Phulambri Taluka) तालुक्यात भाजपच्या सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा एक सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमता दानवे बोलत होते. रावसाहेब दानवे हे नेहमीच आपल्या वेगवेगळ्या विधानांमुळे जोरदार चर्चेत असतात. आताही निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केलेल्या विधानामुळे ते चर्चेत आहेत. दानवे यांनी म्हटले आहे की, राज्यातील एकूणच राजकीय घडामोडी आणि परिस्थिती पाहता लोकसभा निवडणुकीसोबतच विधानसभेच्या निवडणुकाही पार पडतील. तसेच, औरंगबादमधील अनेक नेते भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील असेही त्यांनी म्हटले. (हेही वाचा, Raosaheb Danve Statement: महाराष्ट्रात लवकरच मध्यावधी निवडणुका होतील, रावसाहेब दानवेंचे विधान)
मध्यावधी निवडणुका लागतील असे सत्ताधाऱ्यांपूर्वीच विरोधकांनी म्हटले होते. अजित पवार, संजय राऊत, आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांनी मध्यावधी निवडणुका लागतील अशी शक्यता वर्तवली होती. त्यातच आता रावसाहेब दानवे यांचे विधान आले आहे. त्यामुळे अनेकांनी आता मध्यावधी निवडणुका लागतील असे जवळपास निश्चित मानले आहे.