कोरोना विषाणू (Coronavirus) संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) हाहाकार माजवला आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होता दिसत आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी आणि सफाई कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 48 तासात महाराष्ट्र पोलीस दलातील (Maharashtra Police) आणखी 278 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, एका कर्मचाऱ्यांचा आज मृत्यू झाला आहे. ज्यामुळे महाराष्ट्र पोलीस दलातील कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांच्या मृतांची संख्या 71 वर पोहचली आहे. ज्यामुळे पोलीस प्रशासनापुढे कोरोनाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून ठोस पावले उचलली जात आहेत. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस कर्मचारी महत्वाची महत्वाची भुमिका बजावत आहेत. ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्या कामगिरीची कौतूकही केले जात आहे. हे देखील वाचा- Government Jobs in Maharashtra: राज्यात 10 हजार पोलिसांची भरती, वर्षभरात होणार प्रक्रिया पूर्ण; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा
एएनआयचे ट्वीट-
Maharashtra Police reported 278 COVID-19 cases and one death in the last 48 hours, taking active cases in the force to 1,113 and death toll to 71: Police pic.twitter.com/wsWZu9Hs91
— ANI (@ANI) July 8, 2020
महाराष्ट्रात मंगळवारी सायंकाळपर्यंत तब्बल 5 हजार 134 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 224 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 2 लाख 17 हजार 121 वर पोहचली आहे. यापैकी 9 हजार 250 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 1 लाख 18 हजार 558 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे.