'देवेंद्र फडणवीस तुम्ही मुख्यमंत्री असता तर आमच्यावर ही वेळ आली नसती', महाराष्ट्र पोलिसाने भर रस्त्यात मांडली व्यथा (Watch Video)
Devendra Fadnavis Viral Video (Photo Credits: Twitter)

माजी मुख्यमंत्री व विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे काल नागपूर (Nagpur) वरून मुंबईला (Mumbai) प्रवास करत असताना वाशीम (Washim) जिल्ह्यातील जऊळका पोलीस चौकी जवळ शिवाजी हायस्कूलजवळ थांबले होते. यावेळी परिसरातील शेतकरी व नागरिकांसोबत त्यांनी संवाद साधून त्यांची विचारपूस केली, इथून निघण्याच्या आधी एका पोलिसाने फडणवीस यांच्याकडे आपली व्यथा मांडली. कोरोनाचे संकट असताना आमच्याकडे किट नाही, मास्क नाही, सॅनिटायझर नाही. आपण मुख्यमंत्री असता, तर आज आमच्यावर ही वेळ आली नसती’ अशा शब्दात या पोलिसाने फडणवीस यांच्याजवळ आपली अडचण व्यक्त केली. या प्रसंगाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ शेअर करत फडणवीस यांच्या समर्थकांनी सुद्धा प्रतिक्रिया दिल्या आहेत. Coronavirus: शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही एक पत्र लिहावं- देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस या व्हिडीओ मध्ये सुरेश मुंडे आणि विनोद घागे यांच्यासमवेत दिसून येत आहेत. या पोलिसाने मांडलेली व्यथा ऐकताच फडणवीस यांनी त्यांना आधार देत तुम्ही काळजी घ्या, तुम्ही कोरोनाच्या विरुद्ध लढ्यात दिवसरात्र काम करत आहात, मदतीसाठी काय करता येईल ते आम्ही पाहतो असे म्हंटले आहे. Coronavirus Update: महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहे किती कोरोना रुग्ण; जाणून घ्या आजचे ताजे अपडेट्स

पहा व्हायरल व्हिडीओ

दरम्यान,जऊळका पोलिस ठाण्याचे DSP यांनी पोलिस अधिकाऱ्यांना राजकारणाच्या चर्चांमध्ये पडू नका असे आवाहन केले आहे. “पोलिस अधिकाऱ्यांना मास्क, सॅनिटायझर्स आणि शिल्ड मास्क दिले आहेत. जर काही अतिरिक्त आवश्यकता असेल तर कृपया या विषयावर राजकारण करण्याऐवजी डीएसपीच्या कार्यालयात विनंती करा ”, असे सांगण्यात आले आहे. आतापर्यंत, महाराष्ट्रात एकूण 1328 महाराष्ट्र पोलिस कोरोना बाधित असल्याचे आढळले आहेत.