Coronavirus: शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही एक पत्र लिहावं- देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis | (Photo Credits-Facebook)

सरकारनं कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाचा धोका ओळखून वेळीच योग्य ती पावले उचलायला हवीत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांना एक पत्र लिहिले आहे. पवार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनाही एक पत्र लिहावे, असा टोला लगावत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यातील महाविकासआघाडी सरकारवर टीका केली आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची आज (मंगळवार, 19 मे 2020) भेट घेतली. या भेटीनंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. या वेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. राज्य सरकार हे कोरोना संकट परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळत नाही. केंद्र सरकारने आणि देशातील विविध राज्यांनी जसे आर्थिक पॅकेज जाहीर केले. त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही जनतेसाठी एक पॅकेज जाहीर करावे. हे पॅकेज का जाहीर केले नाही, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दरम्यन, महाराष्ट्र सरकारने राज्यातील बारा बलुतेदार आणि गोरगरीब जनतेसाठी काहीही केले नाही. राज्यातील अनेक नागरिक विदेशात अडकले आहेत. या नागरिकांना राज्यात परत आणण्यासाठी सरकार काय प्रयत्न करत आहे. रस्त्याने पायी जात स्थलांतर करणाऱ्या मजूर आणि गरीब नागरिकांसाठीही सरकार काहीही करत नाही. उलट काहीही न करता बला टळली असे सरकारला वाटते, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. (हेही वाचा, Coronavirus: लॉकडाऊन काळात कामाच्या ठिकाणी COVID 19 प्रसार रोखण्यासाठी MOHFW ने जारी केली मार्गदर्शक तत्वं)

जे नागरिक कोरोना व्हायरस संक्रमित आहेत त्यांचा सर्व खर्च राज्य सरकारने करावा. रुग्णालयांचा खर्च इतका भयावह आहे की, हा खर्च गोर गरीब जनताच नव्हे तर मध्यम आणि उच्च वर्गीयांनाही पेलणे शक्य नाही. त्यामळे राज्य सरकारने रुग्णालयांना या आजाराच्या फीबाबाबत योग्य ते शुल्क आकारण्यास सांगावे, असे फडणवीस म्हणाले.

दरम्यान, पुढे बोलताना फडणवीस यांनी सांगितले की,  सामान्य माणसाला रेशन मिळत नाही, घोटाळे सुरु आहेत, केंद्राने राज्याला पैसे देऊन ज्यांच्याकडे रेशन नाही, त्यांनाही देण्याच्या सूचना आहेत, पण ज्यांच्याकडे कार्ड आहे त्यांनाच मिळत नाही, रुग्णांना अॅम्बुलन्स मिळत नाही. रुग्णांना अॅम्बुलन्स मिळत नाही, त्याअभावी रुग्णांचे मृत्यू होत आहेत, एक डॅशबोर्ड बनवून, रुग्णालयातील जागा सांगू शकतो, त्यामुळे रुग्णांची हेळसांड थांबेल, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

केंद्राने 85 टक्के तिकिटाचे पैसे दिले, राज्याने 15 टक्के द्यायचे होते, मात्र महाराष्ट्रातील अज्ञानी मंत्र्यांना रेल्वेच्या खर्च किती येतो हेच माहित नाही, त्यामुळे महाराष्ट्र बचाव ही भाजपची भूमिका घेऊन निवेदन आम्ही राज्यपालांना निवेदन दिले. केंद्राने एवढं मोठं पॅकेज दिलं, तरीही यांचं केंद्राकडे बोट, ते राजकारण नाही आणि आम्ही सूचना मांडल्या की आमचं राजकारण कसं? असा सवालही देवेंद्र फडणवीस यांनी विचारला. पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्य सरकारला जी मदत हवी असेल ती करु, त्यांनी आम्हाला सांगावं, आम्ही पाठिशी उभं राहू, मात्र मुख्यमंत्र्यांनी पहिली बैठकच दोन महिन्यांनी घेतली, आम्ही तर सहकार्य करायला तयारच आहे, त्यामध्ये केवळ औपचारिकता नको.