One gate of Khadakwasla Dam in Pune (Photo Credits: ANI)

पुणे (Pune) शहराला पाणी पुरवठा करणारे खडकवासला धरण (Khadakwasla Dam) भरले आहे. पावसाची संततधार सुरुच असल्याने आज धरणाचा एक दरवाजा उघडण्यात आला असून पाण्याचा विसर्गाला सुरुवात झाली आहे. "खडकवासला धरण 90 टक्क्यांपेक्षा जास्त भरल्याने मुठा नदीपात्रात विसर्ग सुरु करण्यात आला असून विसर्गाचा वेग 428 क्युसेक इतका आहे. विसर्ग जास्त नसला तरी पुणे महानगरपालिकेने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क ठेवली आहे," अशी माहिती महपौर मुरलीधर मोहोळ (Mayor Murlidhar Mohol) यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.

पुणे शहरावार पाणीसंकट घोंगावत होते. याच पार्श्वभूमीवर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी अधिकारी वर्गासोबत बैठक घेतली होती. तसंच गणेशोत्सव असल्याने सध्या तरी पाणी कपात करण्यात येणार नाही, असेही स्पष्ट केले होते. दरम्यान धरणांमध्ये पाणी साठा वाढल्याने पुणेकरांवरील पाणी कपातीचे संकट टळले आहे.

महापौर मुरलीधर मोहोळ ट्विट:

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चार धरणातील पाणीसाठा:

# खडकवासला : 1.96 टीएमसी/99.16 %

# पानशेत : 7.53 टीएमसी/70.75 %

# वरसगाव : 7.47 टीएमसी/58.28 %

# टेमघर : 1.67 टीएमसी/ 44.95 %

सध्याचा पाणीसाठा – 18.63 टीएमसी व 63.91%

पावसाची संततधार सुरुच असल्याने धरणातील पाणी साठ्यात चांगली वाढ झाली आहे. त्यामुळे पुणेकरांवरील पाणी संकट टळले आहे, असे म्हणायला हरकत नाही. दरम्यान मागील आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे कोल्हापूरातील राजाराम धरणही ओव्हर फ्लो झाले होते.