ठाणे येथील घोडबंदर रोडवर कार झाडाला आदळून भीषण अपघात; एकाचा मृत्यू, 3 जण जखमी
Thane Accident (Photo Credits: ANI)

ठाणे (Thane) येथील घोडबंदर रोड (Ghodbunder Road) येथे झालेल्या कार अपघातात (Car Accident) एकाचा मृत्यू झाला आहे. तर 3 जण जखमी झाले आहेत. शनिवारी (13 जून) रात्रीच्या वेळेस हा अपघात झाला. कारची धडक झाडाला बसल्याने झालेल्या दुर्दैवी अपघातात एक व्यक्तीला आपले प्राण गमवावे लागले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

घटनेची माहिती मिळताच कापूरबावडी पोलिस स्टेशनमधून पोलिस, प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष (Regional Disaster Management Cell) आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर रेस्क्यू ऑपरेशन सुरु झाले. प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि ठाणे महानगरपालिका यांनी दिलेल्या माहितीनुसार, कापूरबावडी येथील विहंग हॉटेलजवळ ही दुर्घटना घडली. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

ANI Tweet:

पावसाळ्यात अनेक कारणांमुळे अपघाताचे प्रमाण वाढते. त्यात रात्रीच्या वेळेस प्रवास करताना विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे. पावसाळ्यात दुचाकी स्लीप होणे, पाऊस, अंधार यामुळे समोरचे न दिसणे अशा समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे एखादी लहानशी चुकही जीवावर बेतू शकते. म्हणूनच पावसाळ्यात वाहन चालवताना आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे आहे.