प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

महाराष्ट्रातील (Maharashtra) पालघर (Palghar) जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या परिसरातील एका व्यक्तीने केवळ 500 रुपयासांठी आपली जीवनयात्रा संपवली आहे. याप्रकरणी पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी रामदास कोरडे (Ramdas Korde) यांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीने आपल्या मुलाच्या अंत्यविधीसाठी रामदास यांच्याकडून 500 रुपये घेतले होते. मात्र, हे पैसे ते वेळेवर परत न करू शकल्याने रामदास कोरडे यांनी संबंधित व्यक्तीला आपल्या शेतावर वेठबिगारीचे काम करण्यास भाग पाडले. याच छळाला कंटाळून या व्यक्तीने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे.

काळू पवार (वय, 48) असे आत्महत्या केलेल्या शेतमजुराचे नाव आहे. मागील वर्षी दिवाळीच्या आसपास काळू पवार यांच्या 12 वर्षाच्या मुलाचा अपघाती मृत्यू झाला होता. त्याच्या अंत्यविधीसाठी त्यांच्याकडे पैसे नसल्याने त्यांनी रामदास कोरडे यांच्याकडून 500 रुपये उधार घेतले होते. हे पैसे परत करू न शकल्याने रामदास यांनी बाळूला गडी म्हणून राबवले. तसेच त्याचा मानसिक छळ केला. यामुळेच बाळू यांनी आत्महत्या केल्याचे त्याची पत्नी सावित्री पवार हिने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. सावित्रीच्या तक्रारीवरून रामदास यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हे देखील वाचा- Pune: पुण्यात नवविवाहितेचा राहत्या घरात आढळला मृतदेह; हत्या की आत्महत्या? पोलीस तपास सुरु

एएनआयचे ट्वीट-

महत्वाचे म्हणजे, हे प्रकरण दाबण्यासाठी पोलिसांनी आपघाती मृत्यूची नोंद केल्याचा आरोप आहे. परंतु, मात्र, महाराष्ट्रातील आदिवासींच्या कल्याणासाठी आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते विवेक पंडित यांच्या हस्तक्षेपानंतर पोलिसांनी कारवाई केल्याचे सांगितले जात आहे.