महाराष्ट्र निवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) 23 जानेवारी रोजी पहिले राज्यव्यापी अधिवेशन मुंबई येथे पार पडले होते. दरम्यान, मनसेने आपल्या पक्षाच्या झेंड्यात बदल केला असून पुढील काळात हिंदुत्वाच्या मुद्यावर राजकारण करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. सध्या नागरिकत्व दुरूस्ती कायदा संपूर्ण देशात लागून झाला असून पाकिस्तान आणि बांगलादेश येथील नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्यात येणार आहे. यातच मुंबईसह देशभरात असलेल्या बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांच्याविरोधात राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आक्रमक भुमिका घेतली आहे. तसेच घुसखोरांविरोधात 9 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. यासंदर्भात मनसेच्या महामोर्चाचे टिझर (MNS Teaser) सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून मनसेने घुसखोरांना रोखठोक इशारा दिल्याचे समजते आहे.
नागरिकत्व दुरूस्ती कायद्याला अनेक राज्यातून विरोध दर्शवला जात आहे. दरम्यान, महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या विरोधात असमर्थता दर्शवली आहे. यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक भुमिका स्पष्ट करत पाकिस्तानी आणि बांगालदेशी घुसखोरांविरोधात आक्रमक भुमिका घेतली आहे. मनसे आपल्या ट्विटरच्या अधिकृत खात्यावरून एक व्हिडिओ शेअर करत सर्वांचे लक्ष केंद्रीत केले आहे. हे देखील वाचा-मुंबई पोलिसांच्या आदेशावरुन मनसे ने वळविला 9 फेब्रुवारीचा मोर्चा; 'हा' असेल नवा मार्ग
एएनआयचे ट्वीट-
...अजून किती काळ आपण गाफील राहणार आहोत? #मनसे_महामोर्चा pic.twitter.com/yLNhQQ8HI7
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) February 5, 2020
दरम्यान, मनसेने काही दिवसांपूर्वी वर्सोवा भागामध्ये असलेल्या बांगलादेशांनी आपल्या देशात निघून जाण्याचा इशारा दिला होता. यासाठी वर्सोव्हा भागात पोस्टरही लावण्यात आले होते. याशिवाय पनवेल परिसरातही मनसेच्या कार्यकर्त्यांनी नागरिकत्वल दुरूस्ती कायदा विरोधात पोस्टरबाजी केली होती.