महाराष्ट्रात (Maharashtra) पावसाने चांगलाच जोर धरला असून अनेक जिह्यांत पावसामुळे पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईत (Mumbai) मात्र जुलै महिन्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला. मात्र गेल्या 2-3 दिवसांपासून येथे पाऊस काही प्रमाणात कमी झाला आहे. त्यामुळे उकाडा जाणवायला लागला आहे. हवामान विभागाचे प्रमुख्य के एस होसाळीकर (K S Hosalikar) यांनी येत्या 24 तासांत मुंबईसह विदर्भ, मराठवाड्यात मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे.
गेल्या काही दिवसांपासून दडी मारुन बसलेल्या पावसाने गुरुवारी (24 जुलै) पुन्हा मुंबईत (Mumbai) हजेरी लावली होती. काल सकाळपासून मुंबईच्या काही भागांत हलक्या स्वरुपाच्या पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर संध्याकाळी काही काळ पावसाने विश्रांती घेतली. Maharashtra Monsoon Updates 2020: मुंबई, रायगड मध्ये पुढील 3 तास जोरदार पावसाची शक्यता- IMD
येत्या 24 तासात राज्यात मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता. विदर्भ, मराठवाडाच्या काही भागात तसेच उत्तर मध्य महाराष्ट्र ...
मुंबई मध्यम बरोबर काही जोरदार सरी.. pic.twitter.com/WwIlg4xjvu
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 24, 2020
अशा परिस्थितीत नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी. गरज नसल्यास घराबाहेर पडू नये असे आवाहन केले आहे. तसेच मुंबईत नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती उपाययोजना करण्यात आल्या आहेत.