Maharashtra Monsoon Updates 2020: मुंबई, रायगड मध्ये पुढील 3 तास जोरदार पावसाची शक्यता- IMD
Mumbai Rain | Representational Image | (Photo Credits: PTI)

गेल्या काही दिवसांपासून दडी मारुन बसलेल्या पावसाने आज (24 जुलै) पुन्हा मुंबईत (Mumbai) हजेरी लावली. आज सकाळपासून मुंबईच्या काही भागांत हलक्या स्वरुपाचा पावसाला सुरुवात झाली आहे. पुढील 3 तास मुंबईत पावसाचा जोर कायम राहणार आहे. तर रायगड (Raigad) जिल्ह्यातही पुढील 3 तास पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पुढील 3 तास मुंबई आणि रायगड मध्ये जोरदार पाऊस होणार असल्याचा IMD चा अंदाज आहे.

दरम्यान एएनआय वृत्तसंस्थेने यासंदर्भातील माहिती दिली असून मुंबईतील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे वरील व्हिडिओ ट्विट करत तेथील पावसाची आणि वाहतुकीची परिस्थिती दाखवून दिली आहे. सध्या पावसाचा जोर काहीसा कमी असला तरी पुढील 3 तासांत जोरदार पाऊस होईल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. जुलै महिन्यात अपेक्षित असलेला पाऊस पहिल्या 14 दिवसांतच पूर्ण झाला आहे. सांताक्रूझ येथील वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, शहरात 14 जुलै पर्यंत 822 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

ANI Tweet:

दरम्यान काल मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, नाशिक येथे जोरदार पाऊसचा अंदाज होता. मुंबईतील वातावरणही ढगाळ झाले होते. त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन मुंबई हवामान विभागाचे उपमहासंचालक के.एस.होसाळीकर यांनी केले होते. यंदा होत असलेल्या समाधानकारक पावसामुळे बळीराजाला दिलासा मिळाला आहे.