Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

मुंबई (Mumbai) मध्ये यंदा मान्सून(Monsoon 2020)  च्या सुरुवातीपासूनच पावसाने चांगला जोर धरला आहे. आता तर जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यातच महिनाभरासाठी अपेक्षित 100 टक्के पाऊस पूर्ण होण्याच्या मार्गावर असल्याचे समजतेय. हवामान खात्याच्या माहितीनुसार, सांताक्रूझ (Santacruz) येथील वेधशाळेने शहरात 14 जुलै पर्यंत 822 मिमी पावसाची नोंद केली आहे. साधारणपणे जुलै च्या महिन्यात 840.7 मिमी पाऊस अपेक्षित असतो. जुलै महिन्याची ही अपेक्षित आकडेवारी येत्या दोन तीन दिवसात पूर्ण होईल अशी शक्यता आहे. तर यंदाच्या सीझन मध्ये अपेक्षेप्रमाणे 50  टक्के पाऊस पूर्ण झाला आहे असेही सांगण्यात आले आहे. Mumbai Rains: मुंबई मध्ये सकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात; पुढील 2 दिवस जोर कायम राहण्याची शक्यता

आज पासून पुढील दोन दिवस मुंबई सह उपनगरात आणि ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर, सिंधुदुर्ग या किनारपट्टी लगतच्या जिल्ह्यात मुसळधार पावसाचे अंदाज आहेत. हवामान खात्याने या भागांसाठी ऑरेंज अलर्ट सुद्धा जारी केला आहे. गेल्या 24 तासांत डहाणू 128 mm, कुलाबा 121.6 mm सांताक्रुज‌ 96.6 mm, रत्नागिरी 101.3 mi अलिबाग 122.6 mi इथे इतक्या पावसाची नोंद झाली आहे यासंदर्भात मुंबई हवामान विभागाचे उपमहासंचालक (Dy Director General of Meteorology) के.एस.होसाळीकर (K S Hosalikar) यांनी केले आहे.

दरम्यान, मुंबईला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात जुलैच्या सुरुवातीपासूनच समाधानकारक पाऊस सुरू आहे. या आठवड्यात सुरुवातीलाच सोमवारी 3,39,067 दशलक्ष लिटर पाणी तलावात जमा झाल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच उद्योग धंद्यांसाठी पाणीपुरवठा करणारा पवई तलाव सुद्धा अलीकडेच ओसंडून वाहत होता.