Representational Image/ Lottery (File Image)

महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या (Maharashtra State Lottery) माध्यमातून दर शुक्रवारी आकर्षक वैभवलक्ष्मी लॉटरी (VaibhavLaxmi  Lottery) जाहीर केली जाते. सुमारे 7 लाख रूपयांचे सर्वाधिक रक्कमेचे पहिले बक्षीस दर शुक्रवारी एका लकी विजेत्याला दिले जाते. आज संध्याकाळी 4.15 च्या सुमारास ऑनलाईन या लॉटरीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे जर का तुम्ही देखील  महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या 'वैभवलक्ष्मी लॉटरीचं' तिकीट काढलं असेल तर पहा तुम्ही हा निकाल ऑनलाईन माध्यमातून कसा पाहू शकाल?

वैभवलक्ष्मी लॉटरीचे पहिले बक्षीस 7 लाख रुपयांचे असणार आहे तर दुसऱ्या बक्षीस विजेत्याला 2000 रुपये मिळणार आहेत. याशिवाय तिसऱ्या आणि चौथा क्रमांकासाठी अनुक्रमे 1000 आणि 500 रुपयांचे बक्षीस असणार आहे. तर पाचव्या क्रमांकाच्या विजेत्याला 200 रुपये मिळणार आहेत. सहाव्या क्रमांकासाठी 100रुपये मिळणार आहेत, प्राप्त माहितीनुसार हे सहाव्या क्रमांकाचे बक्षीस हे 600 जणांना मिळणार आहे. याव्यतिरिक्त तब्बल 7000 रुपयांची उत्तेजनार्थ बक्षिसे विविध लोकांमध्ये वाटली जाणार आहेत.

महाराष्ट्र राज्य लॉटरी रिझल्ट lottery.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर pdf फॉरमेट मध्ये जाहीर झाल्यानंतर तुम्ही तो डाऊनलोड करून पाहू शकाल. महाराष्ट्र राज्य लॉटरीचा निकाल ऑनलाईनप्रमाणेच ऑफलाईन माध्यमातून नियमित वर्तमानपत्रामध्येही जाहीर केला जातो.

तुम्हांला 'वैभवलक्ष्मी लॉटरी'मध्ये तुमचा क्रमांक भाग्यवान विजेत्यांमध्ये असल्यास तिकीटाच्या मागे असलेल्या क्रमांकावर तुम्ही संपर्क करू शकता, तसेच Maharashtra State Lottery claim form वर आवश्यक माहिती भरून द्यावी लागेल.यामध्ये पत्ता, मोबाइल नंबर, Pan Card Number, Adhar Card Number ही माहिती भरणं आवश्यक असते.सोबत 2 Witness त्यांचा पत्ता, मोबाइल नंबर, Pan Card Xerox, Adhar Card Xerox ही कागदपत्र स्वाक्षरी करून देणं आवश्यक आहेत.