महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न म्हणजे कौरव पांडवाचं युद्ध नाही, बेळगाव येथे प्रकट मुलाखतीत शिवसेना नेते संजय राऊत यांचा कन्नडिगांना टोला
Sanjay Raut | (Photo Credits: Facebook)

जमीन येत राहते जात राहते. त्यामुळे जमीनीसाठी भाषांमध्ये असू नये. त्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न (Maharashtra-Karnataka Border Dispute) हा काही कौरव पांडवांचं युद्ध नाही, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कन्नडीगांना टोला लगावला आहे.वाद, उत्सुकता, संघर्ष आणि उत्सुकता अशा विविध टप्प्यांनंतर अखेर बेळगाव येथे शिवसेना खासदार (Shiv Sena) संजय राऊत (Sanjay Raut) यांची प्रकट मुलाखत पार पडली. सीमाभागासारखा नाजूक विषय, शिवसेनेची मराठी अस्मिता आणि संजय राऊत यांचे रोखठोक शैली ध्यानात घेता त्यांच्या मुलाखतीबद्दल उत्सुकता होती. या वेळी बोलताना याठिकाणी (कर्नाटक-महाराष्ट्र) दोन्ही बाजूने पांडव आहेत, केवळ थोडा भाषेचा आणि संस्कृतीचा झगडा आहे. कर्नाटकातील अनेक कलावंत, साहित्यिक यांच महाराष्ट्रातील साहित्यामध्ये योगदान आहे, असेही राऊत म्हणाले.

राऊत यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे (जसेच्या तसे)

  • कर्नाटकातील अनेक कलावंत, साहित्यिक यांच महाराष्ट्रातील साहित्यामध्ये योगदान आहे. गिरीश कर्नाड, भीमसेन जोशी पंडित, रजनीकांत यांचा समावेश आहे.
  • व्याखानमालेसाठी जमताय ही आनंदाची बाब आहे. नाथ पै काय बोलतात हे ऐकायला नेहरूजीही थांबायचे. बेळगावशी बॅ. नाथ पै यांचं जिव्हाळ्याचं नात होतं. बेळगावमध्ये मराठी भाषेची मशाल पेटलेली आह
  • भाषे भाषेमध्ये वाद असायला नको, कारण देश एक आहे. मुंबई, सोलापूरसह इतर महाराष्ट्रतील जिल्ह्यातील कानडी भाषेंच्या शाळांना अनुदान देण्याचं काम आम्ही करतोय.
  • मुंबई महानगर पालिकेवर शिवसेनेचा झेंडा आहे, तेथील कन्नड शाळा टिकावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. येथील शाळांना अनुदान किंवा हवी ती मदत केली जातेय. शिवसेनेची सत्ता असलेल्या ठिकाणी कन्नड शाळांना अनुदान दिलं आहे. कन्नड साहित्यकांचं मराठी भाषेमध्ये मोठं योगदान आहे, असंही राऊत म्हणाले. (हेही वाचा, शिवसेना खासदार संजय राऊत बेळगाव येथे दाखल; मुलाखतीच्या कार्यक्रमात काय बोलणार याबातब उत्सुकता)
  • काँग्रेसचे दिल्लीतील नेते मल्लिकार्जुन खर्गे हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे प्रभारी आहेत. ते मूळचे कर्नाटकातील गुलबर्ग्याचे आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार बनवण्यात खर्गे यांची अत्यंत महत्वाची भूमिका होती. आम्ही त्यांच्याबरोबर शुद्ध मराठीतच बोलतो असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले.

मुलाखती दरम्यान बोलताना संजय राऊत यांनी राजकारण, राजकारण्यांचे संबंध, पत्रकारीता, कला आदी विषयांवर मनमोकळ्या गप्पा मारल्या. काही किस्से, प्रसंग आणि आठवणींना उजाळा देत राऊत यांनी कोणताही वाद निर्माण होईल, असे विधान कटाक्षाने टाळले. गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत हे आपल्या वक्तव्यांमुळे वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत. त्यामुळे राऊत हे आज काय बोलतात याबाबत उत्सुकता होती.