Maharashtra 12th Results 2020 Declared: बारावीच्या विद्यार्थ्यांना Revaluation,Photocopy साठी 17 जुलै पासून करता येणार verification.mh-hsc.ac.in  वर अर्ज
Exams | (Image Used For Representational Purpose | Photo Credits: Pixabay.com )

महाराष्ट्रात 12वीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतिक्षा आता संपली आहे. दरम्यान राज्यात आज एचएससीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा राज्याचा 12वीचा निकाल 90.66% लागला आहे. कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल लागला असून मुलांच्या तुलनेत मुलींनी बाजी मारली आहे. दुपारी 1 वाजल्यापासून अधिकृत संकेतस्थळावर निकाल ऑनलाईनदेखील जाहीर झाला आहे. मात्र तुम्ही बारावीच्या तुमच्या निकालामधील मार्क्सने समाधानी नसाल तर आता बोर्डाने verification.mh-hsc.ac.in वर अर्ज करण्याचं आवाहन केलं आहे. उद्या (17 जुलै) पासून ऑनलाईन माध्यामातून विद्यार्थ्यांना गुणपडताळणी, पुर्नमुल्यांकन, उत्तरपत्रिकांची फोटोकॉपी देण्यासाठी अर्ज स्वीकरले जाणार आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन माध्यमातूनच अर्ज दाखल करायचा आहे. Maharashtra Board Exam Results 2020: 10वी 12वी च्या निकालामध्ये यंदा नव्या गुणदान पद्धतीनुसार विद्यार्थ्यांना पास होण्यासाठी किमान किती टक्के गुण हवेत? 

शिक्षण मंडळाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 17 जुलै पासून 27 जुलै पर्यंत विद्यार्थ्यांना गुणपडताळणीसाठी अर्ज करता येणार आहे. तर 5 ऑगस्ट पर्यंत उत्तरपत्रिकांच्या फोटोकॉपीसाठी अर्ज करता येईल. गुणपडताळणीसाठी 50 रूपये शुल्क आकारले जाईल. तर ऑनलाईन पेमेंट स्वीकरले जाणार आहे. विद्यार्थ्यांना तांत्रिक बाबीसंदर्भात काही अडचण, शंका असल्यास support@msbshse.ac.in या ई-मेल आयडी वर अथवा ०२०-२५७०५२०७, २५७०५२०८ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन देखील करण्यात आलं आहे.

verification.mh-hsc.ac.in या संकेत स्ठळावर विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका गुणपडताळणी, उत्तरपत्रिका छायाप्रत, उत्तरपत्रिका पुर्नमुल्यांकन, स्थलांतर प्रमाणपत्र यासाठीदेखील अर्ज करता येणार आहे.

यंदा महाराष्ट्रात 12वीची परीक्षा 5 लाख 5 हजार 27 विद्यार्थ्यांनी दिली आहे. यामध्ये 8,43,553 मुलं तर 6,61,325 मुलींचा समावेश असून राज्यात एकून 3036 परीक्षा केंद्रावर परीक्षा पार पडली आहे.