Uddhav Thackeray (Photo Credits: CMO Maharashtra)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने (Coronavirus) थैमान घातल्याने 31 मे पर्यंत लॉकडाउनचे आदेश कायम राहणार आहेत. परंतु राज्य सरकारने रेड आणि कंन्टेंटमेंट झोन वगळता अन्य क्षेत्रात लॉकडाउनचे काही नियम शिथील करण्यात आल्याचा निर्णय जाहीर केला आहे. याच दरम्यान आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज इंडियन ब्रॉडकास्टिंग फाउंडेशन (Indian Broadcasting Foundation) यांच्यासोबत एक बैठक पार पडली. यामध्ये राज्य सरकार सर्वोतोपरी काळजी घेत टीव्ही उत्पानद सुरु करण्याचा विचार करत असल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचसोबत फिल्मसिटीमध्ये पुन्हा शुटिंग सुरु करता येईल का याचा सुद्धा सरकारकडून विचार करण्यात येत असल्याचे उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व भागधारकांशी चर्चा करण्याचे व यासंदर्भात लवकरात लवकर योजना तयार करण्याचे निर्देश सचिवांना दिले आहेत. राज्य सरकार कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. तसेच नागरिकांना सुद्धा कोरोनाच्या पार्श्वभुमीवर स्वत:सह परिवाराची काळजी घेण्याचे आवाहन करत आहे. राज्यात कोरोना व्हायरसचा वेग संथ करण्यास यश आले असले तरीही त्याची अद्याप साखळी तुटलेली नाही असे ही स्पष्ट करण्यात आले आहे.(मुंबईत कंन्टेंटमेंट झोन वगळता अन्य क्षेत्रात दारुची घरपोच डिलिव्हरी करण्यास परवानगी)

दरम्यान, महाराष्ट्रात आज सर्वाधिक म्हणजेच 2940 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यात कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 44,582 वर पोहचल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. तर देशातील कोरोनाची परिस्थिती पाहता आकडा 118447 वर पोहचला असून 3583 जणांचा बळी गेला आहे.