राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे भाजपचे बाह्य कार्यकर्ते! संजय राऊत यांची खोचक टीका
Sanjay Raut | Photo Credit :- Facebook

जेव्हा शिवसेनेने (Shivsena) संख्याबळ सिद्ध करण्यासाठी दावा करत मुदत मागितली होती तेव्हा राज्यपाल कोश्यारी (Governor Bhagatsingh Koshyari) यांनी अवघ्या 24 तासांची वाढ करून देण्यास नकार दिला होता मात्र भाजपाला बहुमत सिद्ध करता आलेले नसतानाही त्यांना सात दिवसांचा अवधी देण्यात आला आहे ,इतकंच नव्हे तर त्याआधीच मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  आणि उपमुख्यमंत्री पदी अजित पवार (Ajit Pawar) यांनी शपथ सुद्धा घेतली, हा अप्रत्यक्ष रित्या केलेला पक्षपात नाही तर काय असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपला रोष आज पत्रकारांच्या समोर व्यक्त केला. आजपर्यंत सीबीआय (CBI) , ईडी (ED) , पोलीस (Police) आणि आयकर विभाग (Income Tax)  हे भाजप चे बाह्य कार्यकर्ते होते मात्र आता यामध्ये राज्यपालांचा देखील समावेश झाला आहे याचा खेद वाटतो असे राऊत यांचे विधान होते.

संजय राऊत यांनी काल शपथविधी पासूनच भाजप व अजित पवार यांना धारेवर घेण्यास सुरुवात केली आहे. " जर का तुमच्याकडे बहुमत असेल तर तुम्ही उघडपणे सत्तास्थापनेचा दावा का केला नाही? असा सवाल भाजपाला राऊत यांनी केला, याउलट जर का राज्यपालानी आता सुद्धा महाविकास आघाडीला आमंत्रण दिले तर तिथेच 160 जणांचे संख्याबळ आम्ही सिद्ध करू शकतो असा विश्वास सुद्धा राऊत यांनी व्यक्त केला आहे.

Maharashtra Government Formation Live Update: शपथविधीनंतर महाराष्ट्रातून सकारात्मक प्रतिक्रिया- आशिष शेलार

अजित पवार यांनी खोटे समर्थन पत्र दाखवून भाजपच नव्हे तर राज्यपालांची सुद्धा फसवणूक केली आहे, आम्हाला वाटत होते की भाजप हा व्यापारात सचोटीची बुद्धी असणार पक्ष आहे मात्र यातून त्यांच्या व्यापार बुद्धीचा प्रत्यय आला असे म्हणत राऊत यांनी भाजपवर टीका केली. आता ३० नोव्हेंबर पर्यंत देण्यात आलेला हा अवधी म्हणजे फोडाफोडीचे राजकारण करून पैसे वाटून भ्रष्टाचार करण्याची मुदतवाढ आहे असेही राऊत यांनी म्हंटले आहे. यातून भाजपवर टीका करताना, अवघ्या पाच आमदारांच्या बदल्यात उपमुख्यमंत्री पद अजित पवारांना देण्याइतकी भाजपाची व्यापार बुद्धी असेल असे वाटले नव्हते असेही राऊत म्हणाले.