प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

महाराष्ट्रातील दुष्काळी आणि टंचाईग्रस्त भागामध्ये आता 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांना आता संपूर्ण फी माफीची घोषणा करत दिलासा दिला आहे. राज्य सरकारचे शालेय शिक्षण विभागाचे मंत्री (शालेय मंत्री) आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी याबाबत घोषणा केली आहे. शालेय शिक्षण मंत्रालयाच्या परिपत्रकानुसार आता विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक,गुणपत्रिका, प्रमाणपत्र अशा सर्व शुल्कांसह "संपूर्ण फी"आता माफ होणार आहे. 17 नंबरचा फॉर्म भरुन दहावी-बारावीची परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना 29 जुलैपासून अर्ज करता येणार

महसूल विभागाकडून टंचाईग्रस्त आणि दुष्काळग्रस्त भागांची, गावांची नावं जाहीर केली जातात. त्यानंतर अशा भागातील विद्यार्थ्यांची फी माफी करण्याचा निर्णय 2015-16 आर्थिक वर्षात घेण्यात आला होता. त्यानुसार 10,12 च्या परीक्षेला बसणार्‍या विद्यार्थ्यांची नावं मुख्याध्यापक विभागीय सचिवांकडे देतात. त्यानंतर त्या रक्कमेचा धनादेश दिला जातो. आता ही फी ऑनलाईन पद्धतीने खात्यामध्ये जमा केली जाणार आहे.

आशिष शेलार  यांचं ट्विट 

महाराष्ट्र शासनाच्या या फी माफीचा फायदा शासकीय, अनुदानित माध्यम शाळा, कनिष्ठ महाविद्यालय (ज्युनियर कॉलेज) च्या विद्यार्थ्यांना लागू राहणार आहे.