17 नंबरचा फॉर्म भरुन दहावी-बारावीची परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना 29 जुलैपासून अर्ज करता येणार
Representational Image (Photo Credits: Facebook)

राज्यात दहावी-बारावी बोर्डाचे निकाल दोन महिन्यांपूर्वी जाहीर करण्यात आले. तर बोर्ड परिक्षा देण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांना विद्यार्थ्यांना 17 क्रमांकाचा फॉर्म भरण्यासाठी येत्या 29 जुलैपासून सुरुवात होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट पर्यंत ठेवण्यात आली आहे.

दहावी आणि बारावी बोर्ड परिक्षेसाठी बसणाऱ्या उमेदवारांना अर्ज करण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला, आधारकार्ड, पासपोर्ट फोटो स्कॅन करुन विद्यापीठाने दिलेल्या संकेतस्थळावर अपलोड करावे लागणार आहेत. तसेच 26 ऑगस्ट पर्यंत विद्यार्थ्यांना परिक्षेचे शुल्क, मूळ कागदपत्रे अर्ज करण्यासाठी नमूद केलेल्या संपर्क केंद्रात द्यायचे आहेत.

पुढील संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार:

दहावीसाठी 17 क्रमांकाचा फॉर्म भरण्यासाठी- http://form17.mh-ssc.ac.in

बारावीसाठी 17 क्रमांकाचा फॉर्म भरण्यासाठी- http://form17.mh-hsc.ac.in

(Board Exam Results 2019: महाराष्ट्रामध्ये SSC, HSC, CBSE, ISCE बोर्डाच्या 10-12 वीच्या विद्यार्थ्यांना पास होण्यासाठी किमान किती टक्के गुण हवेत?)

त्याचसोबत अर्ज भरताना काही अडचणी आल्यास त्याबद्दल संबंधित माहिती विद्यार्थ्यांना संपर्क केंद्राच्या क्रमांकावरुन मिळवू शकता. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अर्ज भरण्यासाठी दिव्यांगत्वाचे प्राधिकृत प्रमाणपत्र जोडणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.