शासकीय व्यवहार वेगवान अणि अधिक पारदर्शी करण्यासाठी तो अधिक डिजिटली करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामध्ये आता महाराष्ट्र शासनाचा कारभार ज्या इमारतीमधून हाकला जातो. तेथे मंत्रालयामध्ये आता टपाल सेवा ई ऑफिसच्या माध्यमातून चालवण्यास सुरूवात झाली आहे. यामध्ये आता आलेली पत्र विभागानुसार वेगळी केली जातील. त्यासाठी प्रत्येक विभागाचा वेगळा कक्ष असणार आहे. ती पत्र मग स्कॅन करून प्रत्येक विभागामध्ये पोहचवली जाणार आहेत.
पहा ट्वीट
मंत्रालयात टपाल देण्यासाठी येणारे नागरिक व क्षेत्रीय कार्यालयांद्वारे प्राप्त होणारे टपाल स्वीकारण्यासाठी #मध्यवर्ती_टपाल_केंद्र मध्ये विभाग व कार्यालयनिहाय व्यवस्था करण्यात आली आहे. हे टपाल स्कॅन करुन संबंधित प्रशासकीय विभागांच्या नोंदणी शाखेस ई-ऑफिसद्वारे पाठविले जाईल. pic.twitter.com/vgJOkEmBYi
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 19, 2023
मंत्रालयात उभारण्यात आलेल्या मध्यवर्ती टपाल केंद्राचे मुख्यमंत्री @mieknathshinde व उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले. मंत्री दीपक केसरकर, अतुल सावे, शंभूराज देसाई, दादाजी भुसे, मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव आदी उपस्थित होते. pic.twitter.com/95UbCTVKtS
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 19, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)