रविवार 2 जुलैच्या दुपारी शरद पवारांपासून दूर होऊन अजित पवारांनी सत्तेत सहभागी होण्याचा आपला मानस खरा करून दाखवला. शरद पवारांनी अजित पवारांच्या बंडावर नाराजी व्यक्त करत आपल्या हयातीमध्ये पक्षाच्या विचारांशी तडजोड करणार्‍यांनी आपला फोटो न वापरण्याचा इशारा दिला आहे. मात्र दुसरीकडे अजित पवारांनी आपल्याला आमदारांची साथ असल्याचं सांगत आज नवं पक्षकार्यालयही सुरू केले. यामध्ये शरद पवारांची तसबीर ठेवण्यात आली आहे. एनसीपी नेते, खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आपण शरद पवारांचा अनादर म्हणून नाही तर त्याच्याबद्दल आदर म्हणून फोटो ठेवत असल्याचं म्हटलं आहे. शरद पवार गुरूस्थानी असल्याचेही ते म्हणाले आहेत.

पहा प्रफुल्ल पटेल यांची भूमिका

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)