Coronavirus | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरसचा राज्यात वाढता प्रभाव पाहता राज्य सरकारकडून अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून आवश्यक अशा उपाययोजना राबवण्यात येत आहेत. यातच आता कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारी ऑफिसेस मध्ये एअर कंडिशन AC चा वापर टाळावा किंवा कमीत कमी करावा असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. या आदेशाचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. (महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा 63 वर; राज्यात देशातील सर्वाधिक रुग्ण)

सरकारी ऑफिसेसमध्ये केवळ 25% कर्मचाऱ्यांच्या आधारावर काम करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे कोरोना व्हायरस थंड वातावरणात जिवंत राहतो. अनेक वेबसाईट्सवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, हा व्हायरस 20-25 डिग्री तापमानात जिवंत राहू शकतो. त्यामुळे कोरोनाचा धोका टाळण्यासाठी सरकारकडून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

ANI Tweet:

कालच्या दिवसभरात राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत 11 ने वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाग्रस्तांचा 54 वर असलेला आकडा आता 63 वर गेला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. देशात इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळे कोरोनाचा धोका टाळण्यासाठी राज्य सरकार सतर्क आहे. 31 मार्चपर्यंत मुंबई, पुणे, नागपूर आणि पिंपरी-चिंचवड या शहरांमध्ये जीवनावश्यक सुविधा वगळता सारे व्यवहार ठप्प करण्यात आले आहेत. तसंच इतर खाजगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम'ची मुभा दिली आहे.