Maharashtra Government Formation: महाराष्ट्राची भावना भाजप विरोधात, शिवसेना आणि राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडी कायम एकत्र राहून देणार लढा
उद्धव ठाकरे आणि शरद पवार पत्रकार परिषद (Photo Credits-ANI)

महाराष्ट्रात सत्ता स्थापन झाल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत राज्यात सत्ता स्थापनेबाबत झालेल्या भुकंपावरुन काही मुद्दे स्पष्ट करण्यात आले. तर पत्रकार परिषद सुरु होण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसून आली. सुरुवातीला शरद पवार यांनी भाषणाला सुरुवात करताना असे म्हटले की, सत्ता स्थापनेसाठी महाशिवआघआडी यांनी प्रयत्न केला. तसेच शुक्रवारी पार पडलेल्या बैठकीत सुद्धा मुख्यमंत्री पदाच्या दाव्यावर ठाम निर्णय घेण्यात आला. मात्र शनिवारी सकाळी अजित पवार यांनी राजभवनात जाऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काही आमदारांनी सुद्धा उपस्थिती लावली. मात्र अजित पवार यांचा हा निर्णय राष्ट्रवादीच्या विरोधात घेण्यात आला आहे. तसेच पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता भाजप सोबत जाणार नसल्याची अपेक्षा शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. एवढेच नाही जे अजित पवार यांच्यासोबत गेलेत आणि जाणार असतील त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येणार आहे. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आम्हाला राजभवनात घेऊन जाण्यात आल्याची माहिती दिली. मात्र कशासाठी बोलावले आहे हे स्पष्ट करण्यात आले नाही. तसेच  सकाळी 7 वाजता धननंजय मुंडे यांच्या बंगल्यावर उपस्थित रहा असे सुद्धा सांगण्यात आले. तर 54 आमदारांची यादी दाखवून अजित पवार यांनी राज्यपालांची फसवणूक केली आहे. तसेच भाजपला बहुमत स्पष्ट करता येणार नसल्याचे ही शरद पवार यांनी म्हटले आहे.

जनादेशाचा अनादर करण्यात आल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शिवसेनेवर करण्यात आला आहे. तर महाराष्ट्राच्या जनतेवर सर्जिकल स्ट्राईक करण्याता आला आहे. तसेच यापुढे आता शरद पवार यांच्यासोबत आम्ही कायम राहणार असे ही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.  तर केंद्रातील नेत्यांनी जे काही त्याच्या विरोधात सूड घेतला जाणार आहे. रात्रीस खेळ चाले या प्रमाणे राज्यात सत्ता स्थापन करण्यात आली आहे.  शिवरायांच्या महाराष्ट्रावर केंद्राने 'फर्जिकल स्ट्राइक' करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात सत्ता स्थापनेच्या संघर्षाला पूर्णविराम मिळाला असून नवे सरकार स्थापन झाले आहे. यामुळे आतापर्यंतच्या राजकरण्याच्या पार्श्वभुमीवर हा सर्वात मोठा भुकंप असल्याचे बोलले जात आहे.  मात्र अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयावरुन सर्वत्र नाराजी व्यक्त केली जात असून त्यांनी विधिमंडळ गटनेते पदाचा गैरवापर केल्याचा सुद्धा आरोप लावण्यात येत आहे. तर अजित पवार यांनी भाजपला दिलेल्या पाठिंब्याच्या खेळीमुळे त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी वाय.बी. सेंटरच्या परिसरात घोषणाबाजी केली. अजित पवार यांची विधीमंडळ गटनेते पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. तसेच धननंजय मुंडे यांचा फोन सुद्धा स्विचऑफ असून ते आता अजित पवार की शरद पवार यांच्यापैकी  कोणाच्या बाजूने आहेत  हे आता पहाणे महत्वाचे आहे.(Maharashtra Government Formation Live Updates: महाराष्ट्रावर सर्जिकल स्ट्राईक करत पाठीमागून वार करण्याचा भाजपाचा डाव; उद्धव ठाकरे यांची टीका)

दुसऱ्या बाजूला शिवसेनेला सुद्धा शुक्रवार पर्यंत उद्धव ठाकरे राज्याचे भावी मुख्यमंत्री असतील असे सहमतीने ठरवण्यात आले. मात्र शनिवारी सकाळी राजभवनात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर हा मोठा धक्का बसला आहे. राजकरणात झालेल्या आजच्या घडामोडी फारच विचित्र असून शिवसेना यामधून कसे बाहेर पडणार हे पहाणे महत्वाचे आहे. एवढेच नाही तर शिवसेनेने मुंबईत आपली ताकद दाखवली पाहिजे असे ही बोलले जात आहे. तर शिवसेनेचा पुढील प्रवास अधिक खडतर होणार असल्याचे ही सांगितले जात असून आता त्यांच्यापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.

तसेच भाजपला राज्यात बहुमत सिद्ध करण्यासाठी जादुई आकडा पार करणे अत्यावश्यक आहे. यासाठी भाजपला 30 नोव्हेंबरपर्यंतचा वेळ देऊ करण्यात आला आहे. विधानसभा निवडणूकीत एकट्या भाजपला 105 जागांवर विजय मिळवता आला आहे. मात्र आता बहुमत सिद्ध करण्यासाठी 145 चा आकडा गाठण्यासाठी जवळ 30-40 आमदारांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार बहुमताचा आकडा एकत्र पार करण्यासाठी काय प्रयत्न करणार हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे