महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा तिढा सुरु होता तो अखेर संपला असून आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तसेच शपथविधी सोहळ्यात महाविकासआघाडी मधील अन्य सहा मंत्र्यांनी सुद्धा कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली. या सहा मंत्र्यांपैकी एक नितीन राऊत यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. राज्याच्या आजवरच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच दोन मुख्यमंत्री पद पहायला मिळणार आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचा स्वीकार करणार असल्याची बातमी पुढे येताच 'हिच ती वेळ' असे म्हणत शिवसेनेने वेळ साधली असल्याचा उत्साह शिवसैनिकांसह महाशिवआघाडीत दिसून येत आहे.
नितीन राऊत यांनी नॉर्थ नागपूर येथून 1999, 2004 आणि 2009 च्या विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यानंतर 2014 मध्ये नितीन राऊत यांनी आघाडी सरकारमध्ये राऊत यांनी हमी आणि जलसंवंर्धन मंत्री होते. तसेच यंदाच्या विधानसभा निवडणूकीत राऊत यांचा विजय झाला होता. नॉर्थ नागपूर येथून सलग पंधरा वर्ष नितीन राऊत यांनी विजय मिळवला आहे. काँग्रेसच्या कोट्यात मंत्रीपदासाठी आमदार नितीन राऊत हे जेष्ठ सदस्यांसोबत पक्षाच्या समितीच्या अनुसूचित जाती आघाडीचे ते राष्ट्रीय अध्यक्ष सुद्धा आहेत. विदर्भातील मागास वर्गीय नेता म्हणून राऊत यांचे नाव आघाडीवर आहे.(महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची घोषणा होताच उद्धव ठाकरे यांनी घेतला शरद पवार यांचा आशिर्वाद)
निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीने एकत्र निवडणूक लढवून अधिक जागा मिळवल्या होत्या. मात्र, मुख्यमंत्रीपदावरुन दोन्ही पक्षात राजकीय वाद सुरु झाला. दोन्हीही पक्ष एकमतावर ठाम असल्यामुळे त्यांच्यातील 30 वर्षापासून असलेली युती अखेर तुटली. मुख्यमंत्रीपदाची घोषणा होताच उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांचा अशिर्वाद घेवून सर्वांचे लक्ष केंद्रीत करुन घेतले आहे. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी राजकारण एकीकडे तर मैत्री एकीकडे ठेवली होती. यांच्या मैत्रीचे अनेक उदाहरण महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे.