महाराष्ट्र (Maharashtra) विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात अनेक राजकीय हालचाली पाहायला मिळाल्या होत्या. यातच शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादी (Shivsena Congress-NCP) पक्ष एकत्र येऊन महाराष्ट्राला नवे सरकार देणार आहेत. आज मुंबई (Mumbai)येथील ट्रायडंट हॉटेलमध्ये (Trident Hote) महाविकासआघाडीची निर्णायक बैठक झाली. उद्धव ठाकरे यांच्या रुपात महाराष्ट्राला नवीन मुख्यमंत्री मिळणार असल्याचे घोषणा या बैठकीत झाली. दरम्यान, मुख्यमंत्रीपदाची घोषणा होताच, उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांचे चरण स्पर्श करुन त्यांचा आशिर्वाद घेतला आहे. उद्धव ठाकरे यांचे हे कृत्य बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्या मैत्रीचे मोठे उदाहरण असल्याचे समजत आहे. उद्धव ठाकरे हे 1 तारखेला मुख्यमंत्रीपदाची शिवाजी पार्कवर शपथ घेणार असून ठाकरे कुटुंबियातील ते पहिले मुख्यमंत्री ठरणार आहेत.
महाराष्ट्रात कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार? याकडे राज्यातील जनेतेचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीने एकत्र निवडणूक लढवून अधिक जागा मिळवल्या होत्या. मात्र, मुख्यमंत्रीपदावरुन दोन्ही पक्षात राजकीय वाद सुरु झाला. दोन्हीही पक्ष एकमतावर ठाम असल्यामुळे त्यांच्यातील 30 वर्षापासून असलेली युती अखेर तुटली. यानंतर शिवसेना पक्षाने काँग्रेस-राष्ट्रवादीला पक्षासोबत हात मिळवणी करत आज महाराष्ट्रात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन केले. दरम्यान, तिन्ही पक्षाची निर्णायक बैठक पार पडली असून उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार असल्याचे घोषीत केले. मुख्यमंत्रीपदाची घोषणा होताच उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांचा अशिर्वाद घेवून सर्वांचे लक्ष केंद्रीत करुन घेतले आहे. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी राजकारण एकीकडे तर मैत्री एकीकडे ठेवली होती. यांच्या मैत्रीचे अनेक उदाहरण महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे. हे देखील वाचा-'एकच वादा अजित दादा' ट्रायडंट हॉटेलसमोर राष्ट्रवादी सर्मथकांकडून एकच घोषणा
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे यांचे नाव घेताच शिवसेना समर्थकांना मोठा आनंद झाला आहे. यात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोलाचा वाटा उचलला होता. महत्वाचे म्हणजे, उद्धव हे ठाकरे कुटुंबियातील पहिले मुख्यमंत्री ठरले आहे. तसेच आज बाळासाहेबाच स्वप्न पूर्ण झाले, अशी अनेकांची प्रतिक्रिया आहे.