'एकच वादा अजित दादा' ट्रायडंट हॉटेलसमोर राष्ट्रवादी सर्मथकांकडून एकच घोषणा
Ajit Pawar | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्राच्या (maharashtra) राजकारणात अनेक बदल घडल्यानंतर अखेर राज्याला नवे सरकार मिळणार आहे. शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस (ShivSena NCP-Congress) एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार आहेत. तर, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार असल्याची माहिती मिळत आहे. मुंबईतील (Mumbai) ट्रायडंट हॉटेलमध्ये आज तिन्ही पक्षांची  निर्णायक बैठक पार पडणार आहे. यामुळे शिवसेना-काँग्रेस, राष्ट्रवादीच्या समर्थकांची त्या ठिकाणी मोठी गर्दी पाहायला मिळाली. दरम्यान, अजित पवार (Ajit Pawar)यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहेत.'एकच वादा अजित दादा' अशा घोषणा देत समर्थकांनी अजित पवार यांचे तोंडभरून कौतुक केले आहे. तसेच अजित पवार लव्ह यू असे फलक हातात घेऊन समर्थकांनी त्यांचे स्वागत केले आहे.

एएनआयचे ट्वीट-