काँग्रेसचे आमदार फुटणार नाहीत, संविधानाची अवहेलना करुन शपथविधी उरकला- अहमद पटेल
काँग्रेस पत्रकार परिषद (Photo Credits-ANI)

महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी शुक्रवार पर्यंत महाशिवआघाडीचे सरकार येणार यावर ठाम निर्णय घेण्यात आला. मात्र शनिवारी सकाळी राजकीय पक्षात मोठा भुकंप होत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा दर्शवला. तसेच राजभवनात उपस्थिती लावत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर राष्ट्रवादी मध्ये फूट पडल्याने हा सगळा पेच निर्माण झाल्याचे अहमद पटेल यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेसोबत कोणताही संभ्रम नसल्याचे ही पटेल यांनी आहे काँग्रेसचे सर्व आमदार पक्षासोबतच आहेत.

तर सत्तास्थापनेसाठी काँग्रेसकडून सत्ता स्थापनेसाठी उशीर झालेला नाही असे ही अहमद पटेल यांनी म्हटले आहे. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे बहुमताची चाचणी जिंकणार असे ही पटेल यांनी म्हटले आहे. तर शुक्रवारी नेहरु सेंटरमध्ये पार पडलेल्या महाशिवआघाडीच्या बैठकीत सकारात्मक चर्चा पार पडली असल्याचे ही पटेल यांनी म्हटले. दुसऱ्या बाजूला अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काही आमदारांनी सुद्धा राजभवनात उपस्थिती लावली. मात्र अजित पवार यांचा हा निर्णय राष्ट्रवादीच्या विरोधात घेण्यात आला आहे. तसेच पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता भाजप सोबत जाणार नसल्याची अपेक्षा शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. एवढेच नाही जे अजित पवार यांच्यासोबत गेलेत आणि जाणार असतील त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येणार आहे. (Maharashtra Government Formation: महाराष्ट्राची भावना भाजप विरोधात, शिवसेना आणि राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडी कायम एकत्र राहून देणार लढा)

ANI Tweet: 

आत काहीही बोलायचे नाही माझ्या सोयीने भुमिका मांडणार असल्याचे अजित पवार यांनी सत्ता स्थापनेनंतर विधान केलेले आहे. अजित पवार यांच्या या विधानामागे मोठी बाब दडली असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहेत. असे असले तरीही अजित पवार यांच्या भुमिकेच्या विरोधात टीका केली जात आहे. तर अजित पवार यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणाऱ्या बारामती येथे सुद्धा दोन गट आता पडले आहेत.