राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar) यांची पक्षातून गच्छंती करण्यात आली आहे. अजित पवार यांनी आज (23 नोव्हेंबर 2019) राजभवनात जाऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि दस्तुरखुद्ध अध्यक्ष शरद पवार यांच्यासाठी हा जोरदार धक्का होता. अजित पवार यांच्या या निर्णयाची यत्किंचितही कल्पना पक्षाला नव्हती. त्यातच अजित पवार यांनी आमदारांच्या स्वक्षरीचे पत्र राज्यपालांकडे दिल्याचाही दावा करण्यात येत आहे. या सर्व घडामोडी पाहता अजित पवार यांच्यावर कारवाई होणार हे नक्की होते.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती देताना म्हटले आहे की, अजित पवार यांना यापुढे पक्षाच्या कोणत्याही निर्णयाचे किंवा आदेशाचे अधिकार नाहीत. अजित पवार यांच्या ऐवजी पक्षाचा व्हिप काढण्याचे अधिकार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना देण्यात आले आहे. तसेच, गटनेता या पदावर दिलीपसिंह वळसे पाटील यांची निवड केली जाण्याची शक्यता आहे.
एनसीपी ट्विट
आ. @AjitPawarSpeaks यांची दि. ३० ऑक्टो. २०१९ रोजी विधिमंडळ पक्षनेता, महाराष्ट्र विधिमंडळ या पदी ठरावाद्वारे झालेली निवड भाजपा सरकारमध्ये सहभागी होण्याची त्यांची भूमिका पक्षाच्या ध्येय-धोरणांशी सुसंगत नसल्याने व पक्षाला मान्य नसल्याने ठरावाद्वारे रद्द करण्यात येत आहे. pic.twitter.com/WoYqKHatoe
— NCP (@NCPspeaks) November 23, 2019
पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या आमदारांची एक बैठक पार पडली. या बैठकीनंतर राष्ट्रवादीने एक पत्रक प्रसिद्ध केले. या पत्रकात म्हटले आहे की, आज शनिवार दिनांक 23 नोव्हेंबर 2019 रोजी दु.4.30 वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणू 2019 मध्ये निवडून आलेल्या महाराष्ट्र विधानमंडळ नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टीच्या सदस्यांची मा. खा. श्री. शरदचंद्र पवार, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत व आमदार श्री. जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महाराष्ट्र प्दरेश यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये खालीलप्रमाणे ठराव मंजूर करण्यात आले.