महाराष्ट्र:  आयुष्याला कंटाळून 28 वर्षीय कॉस्ट्यूम डिझायनरची राहत्या घरी आत्महत्या, मीरा रोड येथील घटना
Image used for Representational Purpose only (Photo Credits: PTI)

मीरा रोड (Mira Road) येथील रहिवाशी असलेल्या एका 28 वर्षीय कॉस्ट्यूम डिझायनर (Costume Designer) याने राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी माहिती देत असे म्हटले आहे की, शेख सलीम खान याने बुधवारी घरी पंख्याला लटकून आत्महत्या केली आहे. या प्रकरणी सुसाईट नोट सुद्धा पोलिसांना मिळाल्याची त्यांनी स्पष्ट केले आहे.(सांगली: नशेबाज मुलाच्या नाहक मागण्यांच्या त्रासाला कंटाळून एका शिक्षकाचा पोटच्या मुलाला ठार मारण्याचा प्रयत्न; आरोपी अटकेत)

खान याने सुसाईट नोटमध्ये असे म्हटले होते की, तो आयुष्याला कंटाळला होता. तसेच त्याच्या या आत्महेत्यासाठी कोणी ही दोषी नसल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी पुढे म्हटले आहे. खान हा कॉस्ट्यूम डिझायनर म्हणून मुंबईतील विविध फिल्म स्टुडिओत काम करत होता. खान याची आई सुद्धा एका उंच इमारतीत राहत असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.पोलिसांनी हे प्रकरण अपघाती मृत्यू म्हणून घोषित केले आहे. परंतु खान याच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास केला जात असल्याचे ही सांगण्यात आले आहे.(बुलढाणा: बाटलीत पेट्रोल न दिल्याच्या रागात ग्राहकाने मालकाच्या केबिन मध्ये सोडले 3 जिवंत साप; मलकापूर रोड वरील घटना)

दरम्यान, सध्या कोरोनाचे संकट राज्यावर आल्याने विविध उद्योगधंदे अद्याप बंदच आहेत. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटून सुद्धा कोणतेच उत्पन्न हाती न आल्याने बहुतांश जणांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहेत. त्यामुळेच अशा पद्धतीच्या घटना ही लॉकडाऊनच्या काळात घडल्याचे यापुर्वी सुद्धा घडल्याचे समोर आले आहे.