Coronavirus in Maharashtra | (Photo credit: archived, edited, symbolic images)

महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस (Coronavirus In Mharashtra) रुग्णांची आकडेवारी दिवसागणिक वाढतच आहे. मागील 24 तासात महाराष्ट्रात कोरोना बाधितांचा आकडा पुन्हा वाढला असून आता रुग्णांची एकूण संख्या 9318 वर पोहचली आहे. यापैकी 400 जणांचा या व्हायरसने बळी घेतला आहे तर 1388 जणांना उपचारांती बरे वाटल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्रात कोरोना च्या पार्श्वभूमीवर सर्व जिल्ह्यांना रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोन मध्ये विभागले गेले आहे. यानुसार, मुंबई (Mumbai), पुणे (Pune), ठाणे (Thane) हे कोरोनाचे मुख्य हॉटस्पॉट (Coronavirus Hotspot) असल्याचे समजतेय. सद्य घडीला मुंबई महानगरपालिका भागात 5776 कोरोना रुग्ण असून आतापर्यंत यातील 219 जणांचा मृत्यू झाला आहे. तर त्यापाठोपाठ पुणे येथे 1993 कोरोना बाधित आढळले असून त्यातील 87 जणांचा आतापर्यंत कोरोनाने बळी घेतला आहे.

या सर्व वाढत्या आकडेवारीत परभणी, वर्धा सहित काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण नसल्याने काहीसा दिलासा आहे मात्र अन्य ठिकाणची परिस्थिती पाहता महाराष्ट्रात कोरोनावरील उपचारांसाठी 3 मे नंतरही लॉक डाऊन वाढवला जाण्याची पूर्ण शक्यता आहे. कोरोना विषाणूबद्दल माहिती: बेस्टच्या 15 कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण; एकाचा मृत्यू

 

कोविड-19महाराष्ट्र राज्याची जिल्हा/मनपा निहाय सध्या स्थिती 
अ.क्र. जिल्हा/मनपा बाधित रुग्ण मृत्यू
1 मुंबई मनपा 6169 240
2 ठाणे 45 2
3 ठाणे मनपा 344 4
4 नवी मुंबई मनपा 142 3
5 कल्याण डोंबिवली मनपा 153 3
6 उल्हासनगर मनपा 3 0
7 भिवंडी निजामपूर मनपा 14 0
8 मीरा भाईंदर 123 2
9 पालघर 41 1
10 वसई विरार मनपा 123 3
11 रायगड 22 0
12 पनवेल मनपा 44 1
ठाणे मंडळ एकूण 7223  263
नाशिक 5 0
2 नाशिक मनपा 19 0
3 मालेगाव मनपा 171 12
4 अहमदनगर 26 2
5 अहमदनगर मनपा 16 0
6 धुळे 8 2
7 धुळे मनपा 17 1
8 जळगाव 30 8
9 जळगाव मनपा 10 1
10 नंदुरबार 11 1
नाशिक मंडळ एकूण 313 27
1 पुणे 58 3
2 पुणे मनपा 1044 76
3 पिंप्री-चिंचवड मनपा 72 3
4 सोलापूर 7 0
5 सोलापूर मनपा 75 5
6 सातारा 32 2
पुणे मंडळ एकुण 1288 89
1 कोल्हापूर 7 0
2 कोल्हापूर मनपा 5 0
3 सांगली 26 0
4 सांगली मिरज कुपवाड मनपा 1 1
5 सिंधुदुर्ग 1 0
6 रत्नागिरी 8 1
कोल्हापूर मंडळ एकुण 48 2
1 औरंगाबाद 1 0
2 औरंगाबाद मनपा 89 6
3 जालना 2 0
4 हिंगोली 15 0
5 परभणी 0 0
6 परभणी मनपा 1 0
औरंगाबाद मंडळ एकूण 108 6
1 लातूर 12 1
2 लातूर मनपा 0 0
3 उस्मानाबाद 3 0
4 बीड 1 0
5 नांदेड 0 0
6 नांदेड मनपा 3 0
लातूर मंडळ एकूण 19 1
1 अकोला 12 1
2 अकोला मनपा 22 0
3 अमरावती 2 0
4 अमवरावती मनपा 26 7
5 यवतमाळ 71 0
6 बुलढाणा 21 1
7 वाशीम 1 0
अकोला मंडळ एकूण 155 9
1 नागपूर 4 0
2 नागपूर मनपा 131 1
3 वर्धा 0 0
4 भंडारा 1 0
5 गोंदिया 1 0
6 चंद्रपूर 0 0
7 चंद्रपूर मनपा 2 0
8 गडचिरोली 0 0
नागपूर मंडळ एकूण 139 1
1 इतर राज्य 25 2
एकूण 9318  400

COVID-19 Symptom : सावधान! 'ही ' आहेत कोरोनाची नवीन लक्षण ; जाणून घ्या सविस्तर - Watch Video

दरम्यान आज देशात 1897 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर 73 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 31332 वर पोहचला आहे. तर यात 1007 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 7695 रुग्ण कोरोना संसर्गातून पूर्णपणे रिकव्हर झाले आहेत. तर 22,629 कोविड 19 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.