BEST Bus| File Image | (Photo Credits: Twitter)

कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण महाराष्ट्राला हादरुन सोडले आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधिक रुग्ण मुंबई (Mumbai) परिसरात आढळून आले आहेत. धक्कादायक म्हणजे, आरोग्य, पोलीस यांच्यापाठोपाठ आता मुंबईतील बेस्ट (BEST) सेवेतही कोरोना विषाणूचा शिरकाव झाला आहे. आतापर्यंत 15 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.  या 15 कर्मचाऱ्यांपैकी 4 जणांची कुठलीही ट्रॅव्हल हिस्ट्री अथवा प्रतिबंधित क्षेत्रातला संपर्क नाही, अशी माहिती बेस्टच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांनमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहे. मात्र, अद्यापही कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सकारात्मक बदल दिसून आला नाही.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सरकारने लॉकडाऊन घोषीत केले आहे. लॉकडाऊनच्या काळात बेस्ट बस ही मुंबईत सुरु असलेली एकमेव सार्वजनिक वाहतुकीची सेवा आहे. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची वाहतूक सध्या बसमधून होत आहे. प्रत्येक बसमध्ये एक चालक आणि कंडक्टर असतो. काही वेळा एक अतिरिक्त सहाय्यक असतो. मात्र, आता बेस्टच्याच 15 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून एकाचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. यात 7 कंडक्टर, 4 बेस्ट ड्रायव्हर, 2 बेस्ट विद्युत विभाग कर्मचारी, 2 परिवहन अभियांत्रिकी विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश होता. हे देखील वाचा- पुणे: आझम कॅम्पस मध्ये मशिदीचं रूपांतर क्वारंटीन सेंटर मध्ये!

Maharashtra COVID-19 Update: एका दिवसात ५२२ कोरोना रुग्णांची वाढ; देशात रुग्णांचा आकडा २९ हजारांवर : Watch Video 

मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत बेस्टच्या 7 हजार 500 कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. तर, खबरदारीचा उपाय म्हणून बेस्टचा 250 कर्मचाऱ्यांना क्वॉरन्टाईन करण्यात आले होते. त्यापैकी 150 जणांचा 14 दिवसांचा क्वॉरन्टाईन कालावधी संपला आहे. मेडिकल फिटनेस बघून क्वॉरन्टाईन कालावधी संपल्यानंतर हे कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत.