प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: PTI)

Maharashtra: राज्यात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा हळूहळू कमी होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज्य सरकारने लॉकडाउनचे निर्बंध सुद्धा काही प्रमाणात शिथील केले आहेत. अशातच आता राज्यातील महाविद्यालये सुरु करण्यासंदर्भात विचार केला जात असल्याची माहिती समोर आली आहे. याबद्दल उच्च आणि मंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी असे म्हटले आहे की, राज्यातील तोकोनाची परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. त्यासंदर्भातील रिपोर्ट 15 दिवसात आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

उदय सामंत यांची कुलगुरुंसोबत एक व्हिडिओ कॉन्फ्रेन्सिंग बैठक पार पडली. तेव्हा महाविद्यालये सुरु करण्यासंदर्भात विचार करण्याच्या मुद्द्यावर चर्चा झाली. तेव्हा कुलगुरुंना जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यास सांगितला आहे. त्याचा रिपोर्ट आल्यानंतर 15 सप्टेंबर ते 1 ऑक्टोंबर पर्यंत महाविद्यालये सुरु करण्याचा विचार केला जाणार आहे.(Maharashtra Scholarship Exam 2021 New Date: 5वी, 8वी च्या शिष्यवृत्ती परीक्षा तारखेत पुन्हा बदल; आता 'या' दिवशी होणार परीक्षा)

दरम्यान, एकूणच शैक्षणिक वर्ष कधी सुरु होणार याबद्दल पुढील 8 दिवसात निर्णय होईल असे ही उदय सामंत यांनी असे म्हटले आहे. परंतु विविध जिल्ह्यात अद्याप कोरोनाची परिस्थिती वेगवेगळी आहे. त्यामुळे महाविद्यालये सुरु करण्यासंदर्भातील निष्कर्ष सुद्धा वेगळे असतील असे ही स्पष्ट करण्यात आले आहे.

तर राज्यात नुकताच बारावी बोर्डाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे आता बारावीनंतरच्या शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया कशी असणार अशी चिंता विद्यार्थ्यांसह पालकांना सतावत होती. याच पार्श्वभुमीवर राज्याचे उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी एक मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार, बारावीनंतर विविध शाखांमध्ये प्रवेश घेण्याची प्रक्रिया 5 ऑगस्ट पासून सुरु होणार असल्याचे उदय सामंत यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांना बारावी बोर्डात मिळालेल्या गुणांच्या आधारावर पुढील प्रवेश दिला जाणार असल्याचे ही सामंत यांनी म्हटले आहे.