Uday Samant | (Photo Credits: Twitter)

राज्यात नुकताच बारावी बोर्डाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे आता बारावीनंतरच्या शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया कशी असणार अशी चिंता विद्यार्थ्यांसह पालकांना सतावत होती. याच पार्श्वभुमीवर राज्याचे उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी एक मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार, बारावीनंतर विविध शाखांमध्ये प्रवेश घेण्याची प्रक्रिया 5 ऑगस्ट पासून सुरु होणार असल्याचे उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांना बारावी बोर्डात मिळालेल्या गुणांच्या आधारावर पुढील प्रवेश दिला जाणार असल्याचे ही सामंत यांनी म्हटले आहे.

बारावी नंतर विद्यार्थ्याला जर उच्च शिक्षण घ्यायचे असेल तर त्याला सीईटी द्यावी लागते. परंतु सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता ती घेण्यात येणार नाही आहे. त्यामुळे कॉमर्स, सायन्स आणि आर्ट्स शाखेतील विद्यार्थ्यांना बारावी बोर्डात मिळालेल्या गुणांच्या आधारावर पुढील शिक्षणासाठी प्रवेश दिला जाईल असे उदय सामंत यांनी जाहीर केले आहे. या संबंधित प्रवेश प्रक्रिया ही उद्यापासूनच सुरु होणार आहे.(MPSC ची महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 4 सप्टेंबरला; राज्य सरकार कडून माहिती)

Tweet:

त्याचसोबत विविध अभ्यासक्रम आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मात्र विद्यार्थ्यांना सीईटी देणे अनिवार्य असणार आहे. त्यासाठी सीईटीच्या परिक्षा केंद्रात सुद्धा वाढ केली जाईल असे ही सांगण्यात आले आहे. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे, कोरोनाची परिस्थिती पाहूनच पुढील शैक्षणिक वर्ष सुरु केले जाईल असे ही सामंत यांनी म्हटले आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. त्या विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण होईपर्यंत  त्यांच्याकडून कोणताही फी आकारली जाणार नाही.