मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा पहिला वाहिला मंत्रिमंडळ विस्तार आज 30 डिसेंबर रोजी विधानभवन (Vidhanbhavan) परिसरात पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री पदी अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासहित 25 कॅबिनेट मंत्र्यांनी तर 10 राज्य मंत्र्यांनी मंत्रिपदाची व गोपनीयतेची शपथ घेतली. यंदा राज्यातरील सर्व भागांचे प्रश्न आवर्जून पुढे यावेत या हेतूने राज्याच्या सर्व भागातून आमदार निवडून त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता. मुंबई- ठाणे परिसरातून या मंत्रिमंडळात पाच आमदारांची वर्णी लागली आहे, यात राष्ट्रवादीकडून जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक, काँग्रेसकडून वर्ष गायकवाड, असलम शेख आणि शिवसेनेकडून ठाकरे कुटुंबाचे वारस आदित्य ठाकरे या नावांचा समावेश आहे.
उद्धव ठाकरे यांनी सहा मंत्र्यांसह 28 नोव्हेंबर दिवशी शिवाजी पार्कवर शपथ घेतली होती. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतिक्षा आमदारांसह राज्यातील जनतेला लागली होती. आजच्या या सोहळ्यात संधी मिळालेल्या मुंबई ठाणे मतदारसंघातील आमदारांची सविस्तर यादी पाहुयात..
आदित्य ठाकरे
शिवसेना युवासेनेचे प्रमुख आणि नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे हे वरळी मतदारसंघातून 65 हजार मतांनी जिंकून आले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीनंतर एकाच कुटुंबातील दोघांना सरकारमध्ये स्थान नको असे म्हणत त्यांच्यावर शिवसेना पक्षातील एकादी महत्वाची भूमिका सोपवण्यात येणार अशी चर्चा होती, मात्र आज सकाळी आदित्य ठाकरे यांच्या नवे कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली. आदित्य हे मंत्रिमंडळातील सर्वात तरुण मंत्री आहेत.
श्री. @AUThackeray यांनी घेतली कॅबिनेटमंत्री पदाची शपथ. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिली शपथ. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित#शपथविधी pic.twitter.com/A6zzDcLrSW
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) December 30, 2019
जितेंद्र आव्हाड
मुंब्रा- कळवा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची देखील आज कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली आहे. राष्ट्रवादी आणि परिणामी शरद पवार त्यांचे अत्यंत निकटवर्तीय नेते म्हणून आव्हाड यांची ख्याती आहे. अत्यंत कणखर नेतृत्व आणि स्पष्ट वक्तेपणामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ते सतत चर्चेत होते.
श्री. @Awhadspeaks यांनी घेतली कॅबिनेटमंत्री पदाची शपथ. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिली शपथ. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मान्यवर उपस्थित#शपथविधी pic.twitter.com/WopNc80OH0
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) December 30, 2019
नवाब मलिक
राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि शरद पवार यांचे विश्वासू नवाब मलिक हे अणुशक्ती नगर येथून निवडून आलेले आमदार असून त्यांनी सुद्धा आज ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्ह्णून शपथ घेतली. राज्यातील अल्पसंख्यांक मुस्लिम वर्गाचे प्रतिनिधित्व करताना नवाब मलिकयांनी महत्वपूर्ण काम केले आहे.
श्री. नवाब मलिक यांनी घेतली कॅबिनेटमंत्री पदाची शपथ. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिली शपथ. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित#शपथविधी pic.twitter.com/kv6ZSyLh6r
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) December 30, 2019
अस्लम शेख
काँग्रेस पक्षाचे मालाड पश्चिम चे विजयी आमदार अस्लम शेख यांनी आज कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. 2019 विधानसभा निवडणुकीतून शेख यांनी 10382 मतांनी दणदणीत विजय मिळवत हॅट्रिक केली होती.
श्री. असलम शेख यांनी घेतली कॅबिनेटमंत्री पदाची शपथ. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिली शपथ. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित#शपथविधी pic.twitter.com/TL1vhDYFJB
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) December 30, 2019
वर्षा गायकवाड
काँग्रेसच्या तिकिटावर धारावी मतदारसंघातून सलग पाचव्यांदा विजय मिळवलेल्या वर्षा गायकवाड यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यापूर्वी त्यांनी महिला आणि बाल कल्याण मंत्री म्हणून अशोक चव्हाण यांच्या कारकीर्दीत काम केले होते. 2004-2019 या प्रदीर्घ काळात त्यांनी धारावी मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे.
श्रीमती वर्षा एकनाथ गायकवाड यांनी घेतली कॅबिनेटमंत्री पदाची शपथ. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिली शपथ. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मान्यवर उपस्थित#शपथविधी pic.twitter.com/TrS6hVDAxC
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) December 30, 2019
दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारानांतर काहीच वेळात खातेवाटप देखील जाहीर करण्यात येणार आहे. यावेळी या नवनिर्वाचित आमदारांवर कोणती जबाबदारी सोपवण्यात येते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.