Maharashtra Cabinet Expansion: नवाब मलिक आणि अब्दुल सत्तार यांच्यासहित 'या' 4 मुस्लिम नेत्यांना उद्धव ठाकरे यांच्या मंत्री मंडळात स्थान, पाहा यादी
नवाब मलिक आणि अब्दुल सत्तार (Photo Credit: Facebook)

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र सरकारने आज आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला आहे. महाराष्ट्रातील (Maharashtra) शिवसेना (Shiv Sena)-राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)-काँग्रेस (Congress) महाआघाडीच्या एकूण 36 मंत्रांनी आज शपथ घेतली. या वेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तर शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य यांनाही मंत्रीपदाची शपथ घेतली. काँग्रेसचे अशोक चव्हाण यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. गेली अनेक दिवसांपासून महाराष्ट्र मंत्रिमंडळातच्या खातेवाटपावरून चर्चा सुरु होती. कोणत्या पक्षाला किती आणि कोणते खाते मिळणार यावर सर्वांचे लक्ष लागून होते. यापूर्वी, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्षातील प्रत्येकी दोन नेत्यांनी शपथ घेतली आहे तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या तीन नेत्यांनी शपथ घेतली आहे. यादरम्यान, 29 वर्षीय शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनीही शपथ घेतली. आदित्य हे सध्याच्या महाराष्ट्र सरकारातील सर्वात युवा नेते आहे. आदित्य ठाकरे हे वरळी, मुंबईचे आमदार आहेत. (Maharashtra Government Cabinet Expansion: वर्षा गायकवाड, यशोमती ठाकूर व आदिती तटकरे; राज्य मंत्रिमंडळ विस्तारामध्ये या 3 महिलांची लागली वर्णी)

याशिवाय, काही मुस्लिम आमदारांनीही शपथ घेतली. नवीन मंत्रिमंडळात आता चार मुस्लिम मंत्री आहेत. राष्ट्रवादीचे नवाब मलिक (Nawab Malik) आणि हसन मुशरिफ (Hasan Mushreef), कॉंग्रेसचे अस्लम शेख (Aslam Sheikh) आणि शिवसेनेचे अब्दुल सत्तार (Abdul Sattar) हे आहेत. सत्तार यांना राज्य मंत्रिपद, आणि अन्य तीन जणांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले आहे. कॉंग्रेसचे आमदार सत्तार विधानसभा निवडणुकीपूर्वी सेनेत दाखल झाले. याशिवाय, आदित्य आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि खासदार सुनील तटकरे यांची कन्या अदिती यांनाही पहिल्यांदा आमदारकीची शपथ घेतली. उद्धव ठाकरे यांनीही तीन अपक्षांना संधी दिली आहे.

राज्यपाल बी एस कोश्यारी यांनी विधान भवन (राज्य विधानमंडळ) संकुलातील नवीन मंत्र्यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे उपस्थित होते. आज शपथ घेतलेल्या एकूण 36 मंत्र्यांपैकी 26 मंत्र्यांनी कॅबिनेट मंत्री आणि 10 मंत्र्यांनी कनिष्ठ मंत्री म्हणून शपथ घेतली.