Yashomati Thakur | Photo Credits: Twitter

CM Uddhav Thackeray Cabinet Expansion: महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा पहिला मंत्रिमंडळाचा विस्तार आज विधानभवन परिसरात पार पडला. या कार्यक्रमामध्ये 36 जणांना राज्याचे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी शपथ दिली आहे. यामध्ये 26 कॅबिनेट आणि 10 राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली आहे. यात यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड आणि आदिती तटकरे यांचा समावेश आहे. त्यापैकी यशोमती ठाकूर (Yashomati Thakur), वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी कॅबिनेट पदाची तर आदिती तटकरे (Aaditi Tatkare) यांना राज्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. इथे पहा महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचे लाईव्ह अपडेट्स

यशोमती ठाकूर आणि वर्षा गायकवाड या कॉंग्रेस पक्षाच्या आमदार असून आदिती तटकरे ही युवा आमदार राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची आहे. आज शपथविधी सोहळ्यानंतर थोड्याच वेळात खातेवाटप जाहीर केले जाणार आहे. Maharashtra Cabinet Ministers List 2019: अशोक चव्हाण, धनंजय मुंडे ते आदित्य ठाकरे; 26 कॅबिनेट आणि 10 राज्यमंत्री सह महाविकास आघाडीचा आज पहिला मंत्रिमंडळ विस्तार; इथे पहा संपूर्ण यादी

यशोमती ठाकूर

वर्षा गायकवाड

आदिती तटकरे

आज पार पडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कॉंग्रेसचे  अशोक चव्हाण, अमित देशमुख, राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे, नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड यांच्यासह शिवसेनेकडून आदित्य ठाकरे, गुलाबराव पाटील यांच्यासह 26 कॅबिनेट आणि 10 राज्यमंत्री पदाची शपथ घेतली तर यासोबतच राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.