मेट्रो (Photo Credits: ANI)

मुंबईकरांच्या सुसाट वेगाला साजेशी अशी वाहतूक यंत्रणा उभारण्याच्या हेतूने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) (MMRDA) ने मागील वर्षी नोव्हेंबर मध्ये 3 नवीन मेट्रो प्रकल्पांची (Mumbai Metro Projects)  घोषणा केली होती, त्यानुसार, आज महाराष्ट्र राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मेट्रो मार्ग-10, 11 व 12 या प्रकल्पांना सविस्तर अहवालासह अंमलबजावणीची मान्यता देण्यात आली. यानुसार गायमुख (Gaimukh)  ते शिवाजी चौक (Shivaji Chowk) (मिरा रोड), वडाळा (Wadala)  ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT)  आणि कल्याण (Kalyan)  ते तळोजा (Taloja0 या दरम्यान लवकरच मेट्रोच्या उभारणीला सुरुवात होणार आहे. यामुळे वाहतुकीसाठी जास्त पर्याय आणि नागरिकांना रोजगारही प्राप्त होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

प्राप्त माहितीनुसार, मेट्रो मार्ग 10 हा एकूण 11.2 किमी लांब असणार आहे, त्यासाठी 4 हजार 467 कोटी इतका खर्च अपेक्षित आहे, यापाठोपाठ मेट्रो मार्ग 11 हा 11.4 किमी तर मेट्रो 12 ही 20.75 किमीचा असणार आहेयासाठी अनुक्रमे 8 हजार 739 कोटी व 4 हजार 132 कोटी इतका खर्च येणार आहे. मेट्रो 11 प्रकल्पातील 8 स्थानके ही भुयारी असणार आहेत. खुशखबर! नगरपालिका, मनपा कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीर फडणवीस सरकारचा महत्त्वपुर्ण निर्णय

याशिवाय मुंबईच्या मेट्रो प्रकल्पात पालघर तालुका, वसई तालुका, अलीबाग, पेन, पनवेल आणि खालापूर तालुका हा परिसरही समाविष्ट करण्यात आला आहे. सोबतच सध्या शहरात मेट्रो 2, 3, 4 आणि 7 चे काम जोरात सुरु असून, अंधेरी (पूर्व) ते दहिसर (पूर्व) मेट्रो मार्ग- 7 आणि दहिसर ते डी.एन. नगर मेट्रो मार्ग 2  काहीच दिवसात सुरू होणार आहे. दरम्यान, आजच्या बैठकीत नगरपालिका, महानगरपालिका कर्मचा-यांना सातवा वेतन लागू करण्याच्या प्रलंबित निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.