Maharashtra Board SSC Online Registration 2021: राज्यात कोरोना व्हायरसचे महासंकट अद्याप कायम आहेत. त्यामुळे शाळा आणि महाविद्यालये सुरु करण्याबद्दल काही जिल्ह्यातून विरोध केला जात आहे. तसेच विद्यार्थ्यांना सध्या ऑनलाईन पद्धतीने शिक्षण दिले जात असून परीक्षा ही त्याच पद्धतीने घेण्यात आल्या आहेत. मात्र राज्य सरकारने कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा आणि उच्च माध्यमिक परीक्षा मार्च 2020 परीक्षांचे निकाल जुलै 2020 मध्ये जाहीर केले. याच पार्श्वभुमीवर 2021 साठी 10 वी च्या परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी mahasscboard.in या संकेतस्थळावर तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी परीक्षा सन 2021 मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (10 वी) आणि माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेस नियमित, पुनर्परीक्षार्थी, यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थ्यांसह श्रेणीसुधार योजने अंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवदेनपत्रे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. (EWS For Maratha Community Students: मराठा विद्यार्थ्यांना ईडब्लूएस प्रमाणपत्राच्या अधारे प्रवेश द्या; मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश)
10 वी च्या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी महत्वाच्या तारखा
तर 2021 मधील परीक्षेसाठी मार्च 2020 अथवा नोव्हेंबर- डिसेंबर 2020 मधील परीक्षेमध्ये एकाच वेळी सर्व विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत आवदेनपत्र भरुन परीक्षेसाठी प्रविष्ठ होता येणार आहे. त्यामुळे त्यापूर्वीचे असे उत्तीर्ण विद्यार्थी किंवा कोणत्याही पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यास श्रेणीसुधार योजनेअंतर्गत परीक्षेस प्रविष्ठ होता येणार नाही आहे.