कोविड 19 च्या संकटाची दहशत दूर करून यंदा पुन्हा बोर्ड पूर्वीप्रमाणे दहावी (SSC Exam),बारावीच्या परीक्षा (HSC Exam) घेणार आहे. काही दिवसांपूर्वी राज्य शिक्षण बोर्डाकडून वेळापत्रक जारी झाले आहे. आता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांची शाळा, कॉलेजमधील उपस्थितीची पडताळणी प्रक्रिया सुरू झाली आहे. बोर्डाच्या नियमानुसार विद्यार्थ्यांना शाळा, कॉलेज मध्ये 75% उपस्थिती अनिवार्य आहे. पहिली टर्म आणि दुसरी टर्म अशा दोन्ही सत्रात त्यांना 75% उपस्थिती दाखवावी लागते.
शाळा आणि कॉलेजच्या प्रमुखांना योग्य कारणावरूनच 15% अनुपस्थितीची मान्यता देते येते. त्यामध्ये प्रामुख्याने वैद्यकीय कारण असते. बोर्डाने विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचा रेकॉर्ड सादर करण्यासाठी 6 फेब्रुवारी पर्यंतची मुदत दिली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीचे प्रस्ताव दिले जाणार आहे. SSC-HSC Exam: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आता बोर्डाच्या परीक्षेत होम सेंटर बंद, शिक्षण विभागाकडून विशेष नियामावली जारी .
विद्यार्थी 60% आणि त्यापेक्षा जास्त उपस्थित असल्यास त्याच्या अनुपस्थितीमध्ये योग्य वैद्यकीय कारण द्यावं लागतं. त्याला मुख्याध्यापक, प्राचार्यांकडून मंजुरी मिळाली की लेखी परीक्षेला बसता येणार आहे. जर विद्यार्थी 50% उपस्थितीमध्ये असल्यास त्याला परीक्षेला बसण्यासाठी अनुपस्थितीचं कारण खरंच अनपेक्षित घटना होत्या का? हे सांगावं लागतं तर 50% पेक्षा कमी उपस्थिती असलेल्यांना शाळा, कॉलेज मधून बोर्डाच्या लेखी परीक्षेला बसता येत नाही.
दरम्यान उपस्थितीचा निकष पूर्ण करण्यासाठी बोर्डाची देखील मंजूरी आवश्यक आहे. ती नसल्यास शाळा, कॉलेज कडून अर्ज मागे घ्यावा लागतो. यंदा एचएससी परीक्षा 21 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे तर एसएससी ची परीक्षा 2 मार्च पासून सुरू होणार आहे. येत्या काही दिवसांत विद्यार्थ्यांना हॉल तिकीट्स उपलब्ध केली जातील.