काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi), प्रियंका गांधी वाड्रा (Priyanka Gandhi Vadra) शनिवारी हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी गेले असताना त्यांना दिल्ली- उत्तरप्रदेश सीमेवरच रोखण्यात आले होते. दरम्यान, पीडिताच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा यांना पोलिसांनी अडवल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका महिला नेत्यासोबत उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या वर्तनावरून अनेकांनी योगी सरकारला धारेवर धरले आहे. यातच भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी याबाबत संतापजनक प्रतिक्रिया दिली आहे. तसेच एका महिला नेत्याच्या कपड्यावर हात टाकण्याची पुरुष पोलिसांची हिम्मत कशी झाली? असा सवालही त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून विचारला आहे.
चित्रा वाघ यांनी काही तासांपूर्वी एक ट्विट केले आहे. ज्यात त्यांनी असे म्हटले आहे की, महिला नेत्याच्या कपड्यांवर हात टाकण्याची पुरुष पोलिसांची हिम्मतच कशी झाली? यूपी पोलिसांनी त्यांच्या मर्यादा समजायला हव्या आहेत. भारतीय संस्कृतीवर विश्वास ठेवणारे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी असा पोलिसांवर योग्य ती कारवाई करावी, अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे. हे देखील वाचा- Rohit Pawar On Hathras Case: मराठी पत्रकार 'चाय-बिस्कुट' खाऊन राहतील, पण प्रामाणिकपणा कधीचं विकणार नाहीत - रोहित पवार
चित्रा वाघ यांचे ट्विट-
पुरुष पुलिस की जुर्रत कैसे हुई कि वो एक महिला नेता के वस्त्रों पर हाथ डाल सके!समर्थन मे अगर महीलाए आगे आ रही है पुलीस कही की भी हो उन्हे अपनी मर्यादा का ध्यान रखना ही चाहीए
भारतीय संस्कृती मे विश्वास रखनेवाले मुख्यमंत्री @myogiadityanath जी ऐसे पुलीसवालोपर सख्त कारवाई करे @dgpup pic.twitter.com/RfbXiIIXcI
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) October 4, 2020
उत्तर प्रदेशातील हाथरस (Hathras येथे गुरांसाठी चारा आणण्यासाठी गेलेल्या एका 19 वर्षीय तरूणीचा बलात्कार तिला मारहाण करण्यात आले होते. दिल्लीतील निर्भया प्रकरणासारखे हे प्रकरण असून यात चार आरोपी तरुणांनी बलात्कार करुन तिची जीभ छाटून तिची मान मोडण्यात आल्याचा अमानुष प्रकार घडला आहे. दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते. मात्र, 29 सप्टेंबर रोजी तिची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. या घटनेनंतर संपूर्ण भारत पेटून उठला आहे. तसेच याप्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणीदेखील केली जात आहे.