Maharashtra Assembly Speaker Election: महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच 28 डिसेंबरला विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. या संदर्भातील निर्णय गुरुवारी राज्य मंत्रीमंडळाने घेतला आहे. मुख्यमंत्री कार्यालयातील एका अधिकाऱ्याने असे सांगितले की, हा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. यंदाच्या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात नाना पटोले यांनी विधानसभेचे अध्यक्षपद सोडल्याने आणि प्रदेश काँग्रेस प्रमुखाच्या रुपात पदभार संभाळण्याची जबाबदारी असल्याने ही सीट रिकामी झाली होती.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत सत्तारुढ युतीचा हिस्सा असलेल्या काँग्रेसकडून विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीसाठी एका खासदाराचे नाव दिले जाणार आहे. नवे विधानसभा अध्यक्ष हे प्रभावी रुपात बजेट सत्रापासून आपले कार्य सुरु करतील.(Maharashtra Assembly Winter Session: महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशानावेळी विरोधी पक्षाच्या सदस्यांचे विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन Video)
या निवडणूकीसाठी काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उर्जा मंत्री नितीन राऊत, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्या नावांची चर्चा आहे. त्यापैकी थोपटे यांचे नाव अध्यक्ष पदासाठी आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे.(Maharashtra Winter Session 2021: नितेश राणे यांचे ‘म्याऊ… म्याऊ’; विधानभवनाच्या पायऱ्यांवर भाजपची घोषणाबाजी)
दरम्यान, विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक ही गुप्त मतदानाऐवजी आवाजी मतदानाने होणार आहे. परंतु यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी आक्षेप घेतला. त्यांनी असे म्हटले की, महाविकास आघाडी सरकार हे सर्वाधिक असुरक्षित सरकार आहे. पुढे असे ही म्हटले की, तु्म्ही सांगता तुमच्याकडे पूर्णपणे बहुमत आहे. तर भीती कसली? अध्यक्ष पदाच्या निवडणूकीसाठी कोणतीही व्हिप नाही असे ही फडवणीस यांनी म्हटले. त्याचसोबत जर सरकार निवडणूक हरली तरीही ते सत्तेतून बाहेर पडणार नाही.