महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2019: लातूरमधून देशमुख बंधू, अमित- धीरज, यांना आघाडी
अमित देशमुख, धीरज देशमुख (Photo Credit: Facebook)

महाराष्ट्रातील (Maharashtra) लातूर (Latur) जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे दोन पुत्र अमित (Amit) आणि धीरज (Dheeraj) कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. 21 ऑक्टोबरला झालेल्या मतदानानंतर आज मतमोजणीला सुरुवात झाली. आणि पहिल्या फेरीच्या मतमोजणीनंतर अमित आणि धीरज, या दोन्ही देशमुख बंधूंनी आघाडी मिळवली आहे. मराठवाड्यातील लातूर ग्रामीण आणि लातूर शहर विधानसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.  या मतदारसंघात देशमुख बंधूची प्रतिष्ठापणाला लागली आहे. मतमोजणीच्या सर्व फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर दुपारी 1 नंतर आसपास मतदारसंघाचा निकाल येण्याची शक्यता आहे. यंदा धीरजच्या विरुद्ध शिवसेसनाने लातूर ग्रामीण मतदारसंघातून सचिन देशमुख यांना उमेदवारी दिली होती. (Satara Loksabha By Election Result 2019: सातारा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले पिछाडीवर)

काँग्रेसने यंदा तिसऱ्यानंद अमित देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. अमित सध्या येथूनही आमदार आहे. त्यांच्यासमोर भाजपचे शैलेश गोविंद कुमार लाहोटी यांनी निवडणूक लढवली आहे. देशमुख कुटुंबांनी लातूर जागेवर बर्‍याच काळापासून वर्चस्व राखले आहे. विलासराव देशमुखानंतर त्यांचा मुलगा अमित 2009 आणि 2014 मध्ये या जागेवरुन निवडणूक जिंकून आमदार झाले. अमित देशमुख यांनी लातूर मतदारसंघातून दोन वेळा विधानसभा निवडणुका जिंकल्या आहेत. 2014 मध्ये अमित देशमुख यांना 11, 9656 मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपाचे शैलेश गोविंद कुमार लाहोटी यांना 70191 मते मिळाली होती.

सध्याच्या निकालानुसार महायुतीला 178, तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीला 88 आणि इतरांना 10 जागांवर आघाडी मिळवली आहे. अनेक दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहे.