पुणे वाहतूक पोलिसांनी (Pune Traffic Police) 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Elections) स्वारगेट परिसरातील वाहनांच्या वाहतुकीत बदल जाहीर केले आहेत. पोलीस उपायुक्त (वाहतूक) अमोल झेंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वारगेट ते नेहरू स्टेडियम दरम्यानच्या रस्त्यावर 19 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 ते दुपारी 1 आणि 20 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 ते 12 या वेळेत वाहतूक बदल लागू करण्यात येणार आहेत. पुणे शहरामध्ये विधानसभा निवडणुक अनुषंगाने स्वारगेट वाहतूक विभागांतर्गत असलेले गणेश कला क्रिडा रंगमंच, येथील मतदान केंद्रावरुन मतदान पथके पी.एम.पी.एम. बसेसद्वारे मतपेट्या घेवुन जाणार आहेत व पुन्हा जमा करणार आहेत.
सदर भागात पी.एम.पी.एम.एल बस पार्किंगसाठी पुरेशी व्यवस्था नसल्याने वाहतूक कोंडी होवू नये, तसेच वाहतूक सुरळीत व सुरक्षित राहण्याकरीता वाहतुकीत बदल करण्यात येत आहे.
Traffic Changes Announced In Swargate-
विधानसभा निवडणुक 2024अनुषंगाने स्वारगेट विभागांतर्गत वाहतुकीमध्ये करण्यात आलेले बदल... pic.twitter.com/QjNjtslX8y
— पुणे शहर वाहतूक पोलीस (@PuneCityTraffic) November 19, 2024
स्वारगेट वाहतुक विभागातर्गंत स्वारगेट ते नेहरु स्टेडियम दरम्यानचे रस्त्यावर 19 नोव्हेंबर सकळी 6 ते दुपारी 1 पर्यंत व 20 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6 ते 12 दरम्यान खालील प्रमाणे वाहतुकीमध्ये बदल करण्यात येत आहे.
1) जेधे चौकातुन सारसबागेकडे जाणारी वाहतुक हॉटेल नटराजकडील लेनवर प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग- जेधे चौकातुन सारसबागेकडे जाणारी वाहतुक ओव्हरब्रिजखालील डावीकडील लेनने इच्छित स्थळी जावे.
2) सोलापुर रोडने जेधे चौक अंडरपासने सारसबागेकडे जाणेस प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग- सोलापुर रोडने येणाऱ्या वाहनांनी जेधे चौक ओव्हर ब्रिजखालील डावीकडे वळण घेऊन होल्गा चौकामध्ये उजवीकडे वळण घेऊन इच्छित स्थळी जावे. (हेही वाचा; How to Check Your Name on the Voters' List: मतदार यादीत तुमचे नाव कसे तपासाल? विधानसभा निवडणूक मतदान करण्यापूर्वी जाणून घ्या)
दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला प्रारंभ होत आहे. सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान केंद्रावर रांगेत उपस्थित असलेल्या सर्व मतदारांचे मतदान होईपर्यंत त्या मतदान केंद्रावर मतदान घेतले जाणार आहे. यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदानासाठी 2 लाख 21 हजार 60 बॅलेट युनिटचा वापर केला जाणार आहे.