BJP's 2019 (Photo Credits: BJP/Twitter)

Maharashtra Assembly Elections 2019: महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीसाठी मतमोजणी सुरु झाली आहे. मात्र राज्यात भाजप आघाडीवर असली तरीही परभणी मधून त्यांना धक्का बसला आहे. परभणी मतदारसंघातील विद्यमान आमदार विजय फड यांचा पराभव झाला आहे. तर फड यांच्या विरोधात काँग्रेसकडून सुरेश वरपूडकर यांना उमेदवारी दिली असून त्यांचा यंदाच्या निवडणूकीत दणदणीत विजय झाला आहे. परंतु अद्याप अंतिम आकडेवारी आणि निवडणूक आयोगाकडून औपचारिकरित्या घोषणा होण्याची शिल्लक आहे.

परभणी अंतर्गत एकूण चार विधानसभा मतदारसंघ येतात. त्यापैकी जिंतूर आणि गंगाखेड या मतदार संघामध्ये राष्ट्रवादीचे काँग्रेसचे आमदार आहेत. मात्र गेल्या 30 वर्षापासून शिवसेनेची सत्ता होती. परंतु गेल्या निवडणूकीत मोहन फड यांनी पाथरी येथून अपक्ष उमेदवार म्हणून विजयी झाले होते. त्यानंतर फड यांनी सेनेत प्रवेश केला. परंतु तेथे सुद्धा शिवसेनेच्या खासदार संजय जाधव यांच्याशी काही वाद झाल्याने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.(परभणी जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघ: पाथरी, परभणी, गंगाखेड, जिंतूर जागांवरील उमेदवार यादी, लढत आणि राजकीय इतिहास घ्या जाणून)

1972 साली पहिल्यांदा इथे कॉंग्रेसने विजय मिळवला होता. मात्र 1990 पासून परभणी जिल्ह्यात शिवसेना-भाजप एकत्र निवडणूक लढवत आहेत. तेव्हापासून हा मतदारसंघ शिवसेनच्या ताब्यात आहे. सध्या शिवसेनेचे डॉ. राहुल वेदप्रकाश पाटील हे इथले विद्यमान आमदार आहेत. यंदा शिवसेनेकडून राहुल पाटील, कॉंग्रेसकडून रविराज देशमुख मनसेकडून सचिन पाटील तर वंचितकडून शेख गौस निवडणूकीसाठी तिकिट देण्यात आले होते.