अजित पवार, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस (Photo Credits- Facebook )

Maharashtra Assembly Elections 2019: महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवणडणूकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आता राजकीय पक्षांची घौडदौड सुरु झाली आहे. तर राज्यातील विविध पक्षांकडून आता विधानसभेसाठी कोणते उमेदवार निवडले जाणार किंवा कोणत्या जागांवर निवडणूक लढवणार याबाबत जोरदार चर्चा सुरु झाली आहे. याच स्थिती राष्ट्रवादी (NCP) पक्षाचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुणे (Pune) विधानसभा मतदारसंघाबाबत जागा वाटपाटाचा फॉर्म्युला जाहीर केला आहे.

पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळावादरम्यान अजित पवार यांनी विधानसभा निवडणूकीसाठी पुण्यातून कुठून आणि किती जागा लढवणार याबाबत स्पष्ट केले आहे. विधानसभा निवडणूकीसाठी राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीने एकूण आठ जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये राष्ट्रवादी पक्ष 4, काँग्रेस 3 आणि 1 जागा मित्रपक्षाला देण्यात येणार आहे.

तसेच राष्ट्रवादी पुण्यातून हडपसर, पर्वती, खडकवासला, वडगाव शेरी येथून निवडणूक लढवणार आहे. तर काँग्रेस शिवाजी नगर, कसबा, कंन्टोन्मेंट आणि मित्रपक्षाला कोथरुड येथील जागा निवडणूक लढवण्यासाठी देण्यात येणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे. त्याचसोबत पुण्यात कार्यकर्त्यांच्या मेळावादरम्यान अजित पवार यांनी मोदी सरकारच्या कामावर टीका सुद्धा केली आहे.(सातारा: शरद पवार यांच्या भाषणात उदयनराजे भोसले यांचा अनुल्लेख) 

तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा यांनी महाराष्ट्रात जर आघाडीची सत्ता आल्यास सर्व शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ होणार असल्याचे आश्वासन दिले आहे. तसेच एबीपी सी-व्होटर सर्वेनुसार राष्ट्रवादी पक्षाला विधानसभा निवडणूकीत पूर्वीपेक्षा अधिक जागांवर विजय मिळवता येईल असे म्हटले आहे. मात्र पुन्हा एकदा आघाडी सरकार सत्तेपासून दूर राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.