प्रतिकात्मक फोटो (FILE PHOTO)

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी (Maharashtra Assembly Elections) ठाणे (Thane) मधील मीरा-भायंदर (Mira-Bhayander) मतदारसंघातून राजस्थान मधील दोन उमेदवारांना तिकिट देण्यात आले आहे. तर निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर निवडणूक अभियान सांभाळण्यासाठी राजस्थान मधील जोधपूर आणि सिरोही-जलौर येथून 100 पेक्षा अधिक लोक येथे पोहचले आहेत. तसेच निवडणूक पूर्ण होईपर्यंत मीरा-भायंदर मतदारसंघाच्या येथेच राहणार आहेत. भाजपने या जागेवरुन नरेंद्र मेहता यांना उतरवले असून ते मूळचे राजस्थान मधील पाली जिल्ह्यातील स्थानिक आहेत. मेहता यांच्या विरोधात अपक्ष म्हणून गीता जैन यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

गीता जैन या पाली जिल्ह्यातील कोसेलाव गावातील स्थानिक रहिवासी आहेत. जैन यांचे सासरे मीठालाल जैन हे पाली लोकसभा मतदारसंघातून खासदार राहिले असून भारतीय युवा शक्ती पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. मीठालाल जैन यांच्यामुळे गीता यांना राजकरणात विस्तार करण्यास अधिक मदत झाली. परंतु मेहता यांनी स्वत:च्या बळावर राजकरणात आपले नाव कोरले आहे. नरेंद्र मेहता हे माजी महापौर शिवाय 2014 मध्ये विधानसभा निवडणूकीवेळी राष्ट्रवादी पक्षाचे गिल्बर्ट मेंडोसा यांना टक्कर देत आमदार बनले. गीत जैन सुद्धा माजी महापौर राहिल्या आहेत.(महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: 21 ऑक्टोबरला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर; सरकारी कार्यालयं, बॅंका राहणार बंद)

माजी अपक्ष आमदार भीमराज भाटी यांनी असे सांगितले की, मुंबई आणि पुण्यात मोठ्या संख्येने राजस्थानी नागरिक राहतात. त्यामुळे आता दोन राजस्थानी उमेदवार एकमेकांच्या विरोधात लढणार असल्याने कोण कोणाला टक्कर देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. महाराष्ट्रात 288 जागांवर 21 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. तर 24 ऑक्टोबर दिवशी या मतदानाची मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे. सध्या अस्तित्त्वात असलेल्या विधानसभेचा कार्यकाळ 9 नोव्हेंबर 2019 पर्यंत आहे.