महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: 21 ऑक्टोबरला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर; सरकारी कार्यालयं, बॅंका राहणार बंद
Representational Image (Photo Credits: Getty Images)

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक 2019 दिवशी प्रत्येक नागरिकाला आपला मतदानाचा हक्क बजावता यावा याकरिता 21ऑक्टोबर दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने अचिसूचनेद्वारा महाराष्ट्रामध्ये 21 ऑक्टोबर दिवशी राज्यभरातील सार्‍या मतदारसंघांमध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यानुसार राज्य आणि केंद्र सरकारची सारी कार्यालयं, निमशासकीय कार्यालयं, महामंडळांची ऑफिसं, सार्वजनिक उपक्रम, बॅंका कामकाजासाठी बंद राहणार आहेत. सरकारकडून ही सुट्टी मतदाराला मतदान वेळेत कधीही जाऊन आपलं मत निवडणूकीत देता यावं याकरिता दिलेली आहे.  महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: PwD App च्या मदतीने दिव्यांग मतदार घरबसल्या करू शकतील मतदार नोंदणी ते व्हिलचेअरसाठी विनंती.

महाराष्ट्रात यंदा 21 ऑक्टोबरला एकाच टप्प्यात संपूर्ण राज्यभर मतदान होणार आहे. मतदान करण्यासाठी नागरिकांचं नाव त्याच्या मूळ निवासस्थानी असलेल्या मतदान केंद्रामधील यादीमध्ये असणं आवश्यक आहे. मतदार यादीमध्ये तुमचं नाव असल्यासच तुम्हांला मतदान करण्याचा हक्क आहे. सामान्यपणे सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत नागरिकांना मतदान करता येऊ शकते. ईव्हिएम मशीन द्वारा मतपेटीत तुमचं मत रेकॉर्ड केले जाते.. Maharashtra Assembly Elections 2019: मतदार यादीत तुमचे नाव कसे तपासाल, जाणून घ्या सोप्प्या स्टेप्स.

288 जागांवर राज्यभर 21 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. तर 24 ऑक्टोबर दिवशी या मतदानाची मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे. सध्या अस्तित्त्वात असलेल्या विधानसभेचा कार्यकाळ 9 नोव्हेंबर 2019 पर्यंत आहे.