Maharashtra Assembly Elections 2019: विधानसभेसाठी कॉंग्रेसने जाहीर केली चौथी यादी; सीएम देवेंद्र फडणवीसांविरुद्ध 'हा' उमेदवार रिंगणात
Congress flags | Representational Image | (Photo Credits: PTI)

Congress Candidates Fourth List: विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Elections 2019) अर्ज भरण्यासाठी एक दिवस शिल्लक असताना, आज रात्री कॉंग्रेसने उमेदवारांची चौथी यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीमध्ये कॉंग्रेसने 19 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. अशा प्रकारे कॉंग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरणारे 142 उमेदवार स्पष्ट झाले आहेत. या यादीमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात कॉंग्रेसने नागपूर दक्षिण मधून आशिष देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. सोबतच कणकवली मतदारसंघातून सुशिल राणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

कॉंग्रेसची चौथी यादी -

उमेदवारांची नावे - 

 1. उदयसिंग पाडवी – नंदुरबार
 2. डी.एस. अहिरे – साक्री
 3. साजिद खान – अकोला पश्चिम
 4. सुलभा खोडके – अमरावती
 5. बलवंत वानखेडे – दर्यापूर
 6. आशिष देशमुख – नागपूर दक्षिण-पश्चिम
 7. सुरेश भोयर – कामठी
 8. उयदसिंग यादव – रामटेक
 9. अमर वरदे – गोंदिया
 10. महेश मेंढे – चंद्रपूर
 11. माधवराव पवार – हडगाव
 12. खैसार आझाद – सिल्लोड
 13. विक्रांत चव्हाण – ओवाला – माजीवाडा
 14. हिरालाल भोईर – कोपरी-पाचपखाडी
 15. बलदेव खोसा – वर्सोवा
 16. आनंद शुक्ला – घाटकोपर पश्चिम
 17. लहू कानडे – श्रीरामपूर
 18. सुशील राणे – कणकवली
 19. राजू आवळे – हातकणंगले

कॉंग्रेसने घटस्थापनेच्या मुहूर्तावर 51 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर दुसऱ्या यादीमध्ये 52 उमेदवारांची नावे होती. त्यानंतर 20 व आता 19 उमेदवार कॉंग्रेसने जाहीर केले आहेत. अशाप्रकारे कॉंग्रेसने आतापर्यंत 142 उमेदवार जाहीर केले आहेत. मुख्यमंत्र्यांविरुद्ध लढणारे आशिष देशमुखे हे भाजप मधून कॉंग्रेसमध्ये गेले आहे. देशमुख हे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांचे चिरंजीव आहेत. (हेही वाचा: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: कॉंग्रेस पक्षाच्या तिसर्‍या उमेदवार यादीमध्ये सिद्धाराम म्हेत्रे, असलम शेख,शिवकुमार लाड यांच्यासोबत 20 जणांची नावं जाहीर)

कॉंग्रेसने प्रसिद्ध केलेल्या यादीमध्ये सुशील राणे – कणकवली, राजू आवळे – हातकणंगले, अमर वरदे – गोंदिया, बलवंत वानखेडे – दर्यापूर ही काही महत्वाची नावे आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात 288 जागांसाठी विधानसभा निवडणूका पार पडणार आहेत. 21 ऑक्टोबर दिवशी मतदान तर 24 ऑक्टोबर दिवशी मतदानाचा निकाल जाहीर केला जाणार आहे.