Maharashtra Assembly Elections 2019: भाजप उमेदवार योगेश टिळेकर यांच्या प्रचारासाठी अभिनेता सनी देओल यांचा हडपसर येथे रोड शो
Suuny Deol (Photo Credit: IANS)

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला (Maharashtra Assembly Elections 2019) अवघे काहीच दिवस शिल्लक राहिले असून सर्वच राजकीय पक्ष शक्तिप्रदर्शन करताना दिसत आहे. यातच भाजपचे खासदार आणि बॉलिवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol) यांनीही आपल्या पक्षाचा प्रचार करण्यासाठी पुढकार घेतला आहे. हडसर मतदारसंघातून (Hadapsar constituency) उमेदवारी मिळवलेले योगेश टिळेकर (Yogesh Tilekar) यांच्या प्रचारात सामील होऊन सनी देओल यांनी रोड शो केला आहे. सनी देओल या मतदारसंघात त्यांची आज मंगळवारी शक्तिप्रदर्शन रॅली काढण्यात आली आहे.

काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी पक्षाचे लोकप्रिय खासदार अमोल कोल्हे यांनीही हडपसर मतदारसंघातून उमेदवारी मिळवलेले चेतन तुपे यांचा प्रचार केला होता. दरम्यान, हडपसर मतदार संघातील अनेक भागात अमोल कोल्हे यांची रॅली काढण्यात आली होती. अमोल कोल्हे यांच्या रॅलीला उत्तर देण्यासाठी भाजपने सनी देओल यांना मैदानात उतरवले आहे. हडपसर मतदारसंघात तिरंगी लढत होणार असून महाराष्ट्र नव निर्माण सेनेकडून वसंत मोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वसंत मोरे यांच्या प्रचारसाठी सोमवारी राज ठाकरे यांची सभा पार पडली. हडपसर मतदारसंघात कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हे देखील वाचा- गडकिल्ले भाड्याने देण्यात काहीच गैर नाही; त्याने नक्कीच अर्थव्यवस्था सुधारेल: उदयनराजे भोसले

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक येत्या 21 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. तसेच या निवडणुकीचा निकाल 24 ऑक्टोबर रोजी लागणार आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपने बहुमत मिळवल्यानंतर येत्या विधानसभा निवडणुकीत कोणता पक्ष बाजी मारणार? काही दिवसात कळणार आहे.