भारतात आलेल्या कोरोनाच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेने संपूर्ण देशाला हादरून सोडले आहे. दरम्यान, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका पाहता संपूर्ण देशात लसीकरण (Corona Vaccination) मोहीमेने वेग घेतला आहे. महत्वाचे म्हणजे, देशात सुरु असलेल्या कोरोना लसीकरणाबाबत समाज माध्यमातून अनेक अफवा पसवल्या जात आहेत. ज्यामुळे नागरिकांच्या मनात गैरसमज निर्माण झाला आहे. यातच जालना जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार घडला आहे. खांडवी गावातील एका वृद्ध व्यक्तिला दोन वेगवेगळ्या डोस दिल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे संपूर्ण परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.
दत्तात्रेय वाघमारे (वय, 72) असे त्या वृद्ध व्यक्तीचे नाव आहे. दत्तात्रेय हे जालना जिल्ह्यातील खांडवी गावातील रहिवाशी आहेत. त्यांनी 22 मार्च रोजी ग्रामीण रुग्णालयात कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर 30 एप्रिल रोजी गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांना कोविशिल्डचा डोस देण्यात आली आहे. परंतु, काही दिवसांनी त्यांना ताप आणि मत्सरचा त्रास जाणवू लागला. याव्यरिक्त त्यांच्या शरिरावर पुरळ उठली, अशी माहिती दत्तात्रेय यांचा मुलगा दिंगबर यांनी दिली आहे. हे देखील वाचा- Mumbai Vaccination Update: मुंबईत येत्या 15-16 मे रोजी लसीकरण बंद राहणार, महापालिकेची माहिती
दिगंबर म्हणाले की 'आम्ही त्यांना परतूरच्या आरोग्य केंद्रात नेले, जेथे त्यांना काही औषधे दिली गेली. काही दिवसांपूर्वी जेव्हा मी माझ्या वडिलांचे दोन्ही लसीकरण प्रमाणपत्र पाहिले, तेव्हा आरोग्य यंत्रणेतील दुर्लक्ष लक्षात आले. प्रथम डोस प्रमाणपत्र दाखवते की दत्तात्रेय वाघमारे यांना कोवाक्सिन देण्यात आले होते. तर दुसर्या डोसचे प्रमाणपत्र दाखवते की त्याला कोव्हिशिल्ड देण्यात आली आहे. मी आणि माझे वडील आम्ही दोघेही शिक्षित नाहीत. माझ्या वडिलांना समान लसचे डोस देणे हे आरोग्य अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे.