गांजा, मोबाईल, कैद्यांचे पलायन अशा विविध कारणांनी चर्चेत राहिलेले नागपूर मध्यवर्ती कारागृह (Nagpur Central Jail) पुन्हा एकदा अत्याचाराच्या प्रकरणामुळे चर्चेत आले आहे. नागपूर मध्यवर्ती कारागृहात हत्या प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या तृतीयपंथीवर लैंगिक अत्याचार (Sexual Assault on Transgender) झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या प्रकरणी 7 कर्मचारी आणि 2 अट्टल गुन्हेगारांविरोधात धंतोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित तृतीयपंथीयाने पत्रद्वारे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठापुढे दाखल केली आहे. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. तृतीय पंथीयाच्या या आरोपांमुळे एकच खळबळ माजली आहे.
नागपूर शहरातील बहुचर्चित चमचम गजभिये हत्याकांडात या तृतीयपंथीयाला अटक करण्यात आली आहे. तो सध्या कच्चा कैदी म्हणून कारागृहात आहे. त्याला सध्या पुरुष बॅरेक्समध्ये ठेवण्यात आले आहे. त्याने अनेकदा आपल्याला वेगळे बॅरेक मिळाले, अशी प्रशासनाकडे विनंती केली होती. मात्र, प्रशासनाने त्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. दरम्यान, कारागृहातील 7 पोलीस कर्मचारी आणि 2 गुन्हेगारांनी त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे, असा आरोप त्याने याचिकेद्वारे केला आहे. याप्रकरणी अॅड. राजेश नायक यांनी याचिकाकर्त्याची बाजू मांडली आहे. हे देखील वाचा- मुंबई पोलिसांकडून आग लागल्याच्या दुर्घटनेप्रकरणी भांडूप पूर्वेतील सनराईज रुग्णालयाच्या विरोधात FIR दाखल
याप्रकरणी न्यायालयाने कारागृह अधीक्षक, उप महानिरीक्षक कारागृह यांना नोटीस बजावली आहे. त्यानंतर गुरुवारी धंतोली पोलिसांनी 9 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे अद्याप समजू शकलेली नाही. हे प्रकरण न्याय प्रविष्ठ असल्याने धंतोली पोलीस याबाबत थेट न्यायालयापुढे माहिती सादर करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.